दक्षिण भारताचं सौंदर्य अनुभवा किफायतशीर दरात; पाहा IRCTC चं Tour Package

Sat, 19 Aug 2023-8:31 am,

DAKSHIN BHARAT YATRA : आयआरसीटीसीकडून तुमच्या हिवाळी सुट्टीचा बेत आतापासून आखण्यात आला आहे. या दिवसांमध्ये उत्तर भारताला बगल देत यंदाच्या वर्षी तुम्ही दक्षिण भारत फिरून पाहा. 

 

दक्षिण भारतातील मन मोहणारं सौंदर्य, तेथील संस्कृती आणि तेथी खाद्यसंस्कृतीला जवळून पाहण्यासाठी IRCTC तुमच्यासाठी घेऊन आलंय 'दक्षिण भारत यात्रा'.

दक्षिण भारतातील लोकप्रिय स्थळं त्यातही आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या मंदिरांची सफर तुम्हाला या सहलीतून घडणार आहे. एक सकारात्मकता आणि कमालीची उर्जा देणारी ही सहल तुम्हाला असंख्य नवे अनुभव देणारी ठरेल. 

 

11 रात्री आणि 12 दिवसांसाठीच्या या सहलीची सुरुवात 11 डिसेंबर 2023 ला होणार असून, 22 डिसेंबर 2023 ला ही सहल पूर्ण होईल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेननं या सहलीचा प्रवास पूर्ण होईल. 

मालदा शहर, न्यू फरक्का, पाकुर, रामपुरहाट, दुमका, हंन्सदीहा, भागलपूर, सुलतानगंज, जमालपूर, किऊल, जामुई, झाझा, जसिदीह, चित्तरंजन, कुल्ती, धनबााद, बोकारो, रांची, रौरकेला, संबलपूर अशा स्थानकांवरून तुम्ही रेल्वेत बसू / उतरू शकता. 

आयआरसीटीसीच्या या सहलीमध्ये तिरुपती बालाजी, मिनाक्षी अमन मंदिर, रामनाथस्वानी मंदिर, कन्याकुमारी मंदिर, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर इथं भेट देण्याची संधी तुम्हाला मिळेल. 

या टूर पॅकेजच्या खर्चाचं सांगावं तर, इकोनॉमी क्लाससाठी माणसी 22750 रुपये, स्टँडर्ड क्लाससाठी 36100 आणि कम्फर्ट क्लाससाठी 39500 रुपये इतका खर्च येईल. 

प्रत्येक क्लासनुसार या प्रवासात काही सोयीसुविधा समाविष्ट असतील. यामध्ये सकाळचा चहानाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश आहे. पर्यटकांचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, गाईड, सुरक्षा या साऱ्याचीही नोंद आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link