एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

गायत्री हसबनीस Tue, 02 May 2023-12:20 pm,

अभिनेत्री आलिया भट्ट आणि ईशा अंबानी यांनी आजच्या मेट गाला लुकमध्ये सर्वांचेच लक्ष वेधले. त्यांच्या लुकची बरीच चर्चा झाली. 

(Photo - @akashambani_fc & @aliabhatt/Instagram)

प्राबल गुरंग (Prabal Gurung) या अमेरिकन फॅशन डिझायनरनं त्या दोघींचे लुक डिझाईन केले होते. आलिया भट्टनं इन्टाग्राम पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की या ड्रेससाठी 1 लाख मोती लावले आहेत. 

(Photo - @akashambani_fc & @aliabhatt/Instagram)

रंग आणि टेक्सचर - आलिया भट्टनं व्हाईट स्लिव्हलेस गाऊन परिधान केला होता ज्याला मोठी गाऊन रिंगही (Gown Incide Ring) आत होती. त्यासोबतच ईशानं ब्लॅक कलरची साडी परिधान केली होती. 

(Photo - @akashambani_fc & @aliabhatt/Instagram)

एमब्रोयडरी - आलियाच्या ड्रेसला मोत्यांची एमब्रोयडरी होती तर ईशाच्या साडीला डायमंड्स लावले होते. त्यामुळे त्या दोघांचाही कलर पॅलेट आणि डिझायनर लुक खुलून दिसत होता. 

(Photo - @priyankarkapadia & @aliabhatt/Instagram)

या दोघींच्या एक्सेसरीजही लक्षात राहणाऱ्या ठरल्या. ईशानं हातात वेलवेटची पोटली घेतली होती तर आलियानं मोत्याचे कानातले आणि हातात तळहातांचे ब्रेसलेट घातले होते.   

(Photo - @priyankarkapadia & @aliabhatt/Instagram)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link