रोज वाचवा 250 रुपये, मिळतील 24 लाख; `या` सरकारी योजनेमुळे बनाल लखपती!

Pravin Dabholkar Mon, 06 May 2024-4:29 pm,

PPF Investment: प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही ना काही भाग गुंतवत असतो. आपले पैसे सुरक्षित राहावेत, चांगले रिटर्न्स मिळावेत, अशा ठिकाणी ही गुंतवणूक केली जाते. बाजारात खासगी कंपन्यांच्या अनेक सेव्हिंग प्लान्स आहेत. ज्यात सरकारी स्किम्स खूप प्रसिद्ध आहेत. 

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉविंडंट फंडमध्ये चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. येथे तुम्ही रोज 250 रुपये गुंतवलात तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 24 लाखाचा एकगठ्ठा फंड मिळू शकतो. 

पब्लिक प्रोविडंट फंडमध्ये चांगले व्याज मिळते. ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. सध्याचा पीपीएफ इंट्रेस्ट 7.1 टक्के आहे. तसेच पोस्ट ऑफिसच्या या स्किमचे खूप फायदेदेखील आहेत. 

पीपीएफमध्ये प्रत्येक वर्षी होणारी गुंतवणूक ही टॅक्स फ्री असते. याशिवाय गुंतवणूकदारांना मॅच्योरिटीवर मिळणाऱ्या फंडवरदेखील कोणता टॅक्स द्यावा लागत नाही. 

रोज 250 रुपये वाचवून तर तुम्ही दर महिन्याला 7500 रुपये गुंतवाल तर वर्षाचे 90 हजार रुपये गुंतवले जातील. ही गुंतवणूक तुम्हाला 15 वर्षे सुरु ठेवायची आहे. 

15 वर्षात 90 हजाराच्या हिशोबाने एकूण 13 लाख 50 हजार रुपये जमा होतात. त्यावर 7.1 टक्के व्याजाची रक्कम 10 लाख 90 हजार 926 रुपये आहे. यानुसार मॅच्योरिटीवर तुम्हाला 24 लाख 90 हजार 926 रुपये मिळतील. 

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉविडंट फंड स्किममध्ये तुम्ही 500 रुपये भरुन खाते उघडू शकता. वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतील. यावर रिटर्न, टॅक्स बेनिफिट्स तसेच लोनची सुविधादेखील मिळते. पीपीएफ गुंतवणुकीवर घेतले जाणारे कर्ज तुलनेत स्वस्त मानले जाते. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link