RBI देतेय सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; अर्ज प्रक्रिया, रिटर्न्स सर्वकाही जाणून घ्या
Sovereign Gold Bond Scheme: सोन्यात गुंतवणूक करुन निश्चित आणि चांगले रिटर्न्स मिळवण्याची संधी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला 11 सप्टेंबरपासून सॉव्हरेन गोल्ड बाँडद्वारे गुंतवणूक करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2023-24 मालिका 2 जाहीर केली आहे.
या योजनेअंतर्गत अर्जदार 15 सप्टेंबरपर्यंत सदस्य गुंतवणुकीसाठी अर्ज करू शकतात. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना 2023-24 मालिका 2 अंतर्गत, RBI ने 5,923 रुपये इतकी प्रति ग्रॅम किंमत निश्चित केली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2023-24 मालिका 2 साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना निश्चित किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत मिळेल. तुमच्यासाठी सार्वभौम गोल्ड बाँडची किंमत 5,873 रुपये प्रति ग्रॅम असेल.
ही स्किम बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि NSI आणि BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजद्वारे विकली जाईल.
सार्वभौम सुवर्ण बाँड योजना 2023-24 मालिका 2 चा कालावधी 8 वर्षांचा असेल. यामध्ये 5 व्या वर्षानंतर ज्या तारखेला व्याज देयकाची तारीख असेल तेव्हा मुदतपूर्व विमोचन पर्याय दिला जाईल.
गुंतवणुकदारांना किमान 1 ग्रॅम आणि कमाल मर्यादा प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल-मार्च) सरकारने वेळोवेळी अधिसूचित केल्यानुसार 4 किलोग्रॅम इतकी आहे. एचयूएफसाठी 4 किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम संस्थांसाठी 20 किलो असेल.
सार्वभौम गोल्ड बाँड स्कीम 2023-24 मालिका 2 मधील गुंतवणुकीवर ग्राहकांना 2.50 टक्के वार्षिक व्याज मिळेल. सोन्याचे भाव आधीच त्यांच्या सर्वोच्च पातळी 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून खाली असून प्रति 10 ग्रॅम सुमारे 57 हजार 500 ते 58 हजार रुपये आहे.
कमकुवत जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सोने हे चांगले, निश्चित रिटर्न देणारी गुंतवणूक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चलनवाढ आणि आर्थिक अस्थिरतेविरुद्ध पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते.