Vastu Tips :घरात या दिशेला चुकूनही ठेऊ नका चपला...घरावर येईल प्रचंड संकट...जाणून घ्या योग्य दिशा

Wed, 04 Jan 2023-9:15 am,

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार (vastu tips) घराच्या उत्तर - पूर्व दिशेला चप्पल किंवा बूट ठेवणं, फार अशुभ ठरतं. ही दिशा सकारात्मकतेची आहे, त्यामुळं तिथं पादत्राणे ठेवू नका. घरातील लक्ष्मी निघून जाईल. (Vastu Shastra tips for keeping Shoe Rack)

बेडरुममध्येही चप्पल किंवा बूट ठेवू नका. असं केल्यास नकारात्मक उर्जा (negative energy) फोफावते. उशीपाशीही चप्पल काढून झोपू नका, हे अतिशय अशुभ आहे. 

ज्यांना जीवनात प्रगतीपथावर पुढे जायचं आहे, त्यांनी निळ्या रंगांच्या चपलांना प्राधान्य द्या. (blue color shoe for success) असं केल्यास प्रत्येक कामात यश मिळतं.

मळकट किंवा फाटलेल्या चपला किंवा बूट कधीच वापरु नका. असं केल्यास समाजात तुमची प्रतिमा मलीन होते. आर्थिक फटका आणि दारिद्र्याचं हे लक्षण आहे. 

वास्तुशास्त्रानुसार कधीच पिवळ्या रंगांच्या चपला वापरू नका. पिवळा रंग गुरु ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळं त्या रंगाची चप्पल किंवा बूट घातल्यास तुमचं भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link