Mangal Dosh म्हणजे काय? लग्नाशी कसा संबंध, लक्षणं आणि उपाय जाणून घ्या

Tue, 08 Aug 2023-12:56 pm,

या कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थिती ही अशुभ असेल तर आपल्याला मांगलिक दोषाला सामोरे जावं लागतं. 

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काही घरांमध्ये मंगळ असेल तर मांगलिक दोष तयार होता. कुंडलीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात मंगळ असल्यास मंगळ दोष किंवा मांगलिक दोष तयार होतो. 

मंगळाची ही स्थिती वैवाहित जीवनासाठी अशुभ मानली जाते. अशा व्यक्तीच्या लग्नाला उशीर होतो. लग्न मोडतं, लग्न झालं तरी जीवनसाथीशी वादविवाद होतात. 

कुंडली सातवे घर हे लग्न किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित आहे. या घरात मंगळ असल्यास तो अशुभ मानला जातो. 

याचा परिणाम पती-पत्नीमध्ये अहंकाराचा संघर्ष, तणाव, भांडणे आणि घटस्फोट होतात. त्याशिवाय त्या व्यक्तीवर कर्जाचं डोंगर चढतं. मालमत्तेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. 

ज्योतिष शास्त्रनुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल तर त्याला लग्नापूर्वी कुंडली जुळणे अत्यंत आवश्यक असतं असं म्हणतात. 

मांगलिक दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी मंगळ शांत करण्याचे उपाय ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

मंगळ दोष असलेल्या व्यक्तींनी प्रत्येक मंगळवारी उपवास करायला हवा. त्याशिवाय हनुमान मंदिरात बुंदीचा प्रसादाचे वाटप करावे. 

मंगळवारी पूजेच्या वेळी हनुमान चालीसा सुंदरकांडचा पाठ कराला हवा. शक्य असल्यास मंगळवारी लाल रंगाचे परिधान करा. हनुमानाच्या मंदिरात लाल सिंदूर अर्पण करणं शुभ मानलं जातं. 

 मंगळाच्या शांतीसाठी 3 मुखी रुद्राक्ष किंवा मूंगा रत्न धारण करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. मात्र रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link