हॅपी बर्थ डे ATM, भारतातील पहिली एटीएम मशीन कोणत्या बँकेची आणि कधी सुरु झाली?

राजीव कासले Tue, 03 Sep 2024-7:33 pm,

सध्याचं युग हे डिजीटल युग आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. जगात डिजिटल क्रांती झालीय. पण ज्यावेळी यूपीआय नव्हतं त्यावेळी आपण बँक किंवा एटीएमवर अवलंबून होतो. बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बराच वेळ जात होता. 

 

पण तंत्रज्ञान विकसित झालं आणि एटीएम मशीनचा जन्म झाला. एटीएमचा पूर्ण अर्थ ऑटोमेटेड टेलर मशीन. जगातील पहिली एटीएम मशीन न्यूयॉर्कच्या रॉकविले सेंटरच्या केमिकल बँकेने आणली. डॉकटेल कंपनीत काम करणाऱ्या डॉन वेट्लेज यांचं हे संशोधन होतं. बँकेत पैसे काढण्यासाठी तासनतास वाया जात असल्याने वेटलेज यांनी पैसे देणारी मशीन सुरु करण्याचा निश्चय केला.

 

आजपासून बरोबर 55 वर्षांपूर्वी म्हणजे 2 सप्टेंबर 1969 ला न्यूयॉर्कमध्ये पहिलं एटीएम सुरु झालं. एटीएम मशीनमुळे अमेरिकेत क्रांतीकारी बदल झाला. अमेरिकेनंतर अनेक देशात एटीएमची सुरुवात झाली. 

भारतात पहिली एटीएम मशीन 1987 साली एचएसबीसी बँकने सुरु केली. पुढच्या दहा वर्षात देशात एटीएमची संख्या 1500 पर्यंत वाढली. त्यानंतर देशात एटीएम नेटवर्कचं जाळं विस्तारलं. आज देशभरात विविध बँकांच्या अडीच लाखाहून अधिक एटीएम मशीन आहेत. 

आज जगभरात 10 लाख एटीएम मशीन कार्यर्त आहे. एका अहवालानुसार 2005 मध्ये 18 वर्षाहून अधिक असलेल्या 170 मिलिअन अमेरिकन नागरिकांकडे एटीएम कार्ड होते. महिन्यात सहा ते आठ वेळा या लोकांकडून एटीएमचा वापर केला जात होता.

1990 च्या दशकात बँकांनी एटीएमचा वापर करण्यासाठी शुक्ल आकारायला सुरुवात केली. एटीएम वापरकर्त्यांना फसवणूकीचाही सामना करावा लागत होता. सुमसामन ठिकाणी असलेल्या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या लोकांना लुटण्याच्या घटना आजही घडत आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link