`संजय राऊतांमुळे सेनेचे आमदार फुटताहेत, ते जे बोलतात ते पटत नाही`; कोणी केला हा दावा
Maharashtra Political Crisis LIVE Updates | एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्य वेळी योग्य असाच आहे.असे केंद्रीय मंत्री यांनी म्हटलंय.
पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. हे आमदार सूरत(गुजरात)मध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठ्ठा धक्का बसू शकतो. राज्य सरकारलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'सध्या प्रोसेस, प्रोसेस सुरू असताना भाष्य करणे योग्य नाही. मी जे काही ट्विट केलंय. ते बरोबर आहे. जे काही त्यांच्याबाबत होणार होत्या त्या गोष्टी त्यांनी टळल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्य वेळी योग्य असाच आहे.
बहुमतासाठी 145 आमदारांची गरज असते. विधानपरिषद निवडणुकीआधी बोलणारे उद्धव ठाकरे आता कुठे आहेत?. आतापर्यंत त्यांनी उगाचच बढाया मारल्या. संजय राऊतचा आवाज आज कमी होता. मुख्यमंत्री स्वतःचे आमदार टिकवू शकले नाहीत. संजय राऊतमुळे आमदार फुटताहेत. ते जे काही बोलतात ते शिवसेनेच्या आमदारांनाही पटत नाही.
नारायण राणे यांनी कोणते ट्विट केले?
'शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.' असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते.
राणेंच्या या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. आनंद दिघे हे शिवसेनेचे ठाण्यातील मोठे नेते होते. राणे नक्की असे का म्हटले याबाबत सोशलमीडियावर चर्चा सुरू आहेत.