Astro: सकाळी बेडवरुन उठल्या उठल्या करा `या` मंत्राचा जप, संपूर्ण दिवस जाणार मजेत
Mantra Remedies: सकाळी उठल्यानंतर मूड चांगला असला की दिवस चांगला जातो. पण अनेकदा मूड चांगला असूनही एक एक अशा घटना घडतात की, रात्री राग व्यक्त करून झोपावं लागतं. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होतो. यावर ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत.
Mantra Remedies: सकाळी उठल्यानंतर मूड चांगला असला की दिवस चांगला जातो. पण अनेकदा मूड चांगला असूनही एक एक अशा घटना घडतात की, रात्री राग व्यक्त करून झोपावं लागतं. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होतो. असं हे चक्र सुरु असतं आणि कामं अडकत जातात. पौराणिक शास्त्रानुसार व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळं मिळतात. दिवसाची सुरुवात चांगल्या कर्मांनी केली तर त्याचा फळही चांगलं असेल. जर तुम्हालाही अशीच समस्या जाणवत असेल तर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. काही मंत्रांनी दिवसाची सुरुवात केल्यास दिवस तर चांगला जातो त्याचबरोबर येणारं संकटही टळतं. चांगल्या सुरुवातीमुळे शुभ बातम्या कानावर पडतात. ज्योतिषशास्त्रात मंत्रोपसेनेला खास महत्त्व देण्यात आलं आहे. मंत्र जपामुळे जीवनात सुख-समृद्धी आणि शांती मिळते, अशी मान्यता आहे. चला जाणून घेऊयात सकाळी उठल्या उठल्या कोणत्या मंत्राचा जप करावा.
या मंत्राचा जप करावा
ज्योतिषशास्त्रात सकाळी सकाळी उठल्या आपल्याकडे तळहाताकडे पाहून मंत्र जप केला पाहीजे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात येणारी संकटं दूर होतात. तुमच्या जीवनातही संकटं असतील हा उपाय करा आणि संकटे दूर करा. सकाळी बेडवरून उठताच दोन्ही हात ओंजळीसारखे जोडा. त्यानंतर त्या तळहातांकडे पाहून मंत्रोपसना कराल. या मंत्राचा उच्चार एकापेक्षा अधिक वेळा करू शकता. मंत्र जप झाल्यानंतर दोन्ही हात चोळून उर्जेची निर्मिती करा. त्यानंतर तळव्याचा मूळ भाग दोन्ही डोळ्यांवर ठेवा. यामुळे दिवसभर सकारात्मक उर्जा राहते.
कराग्रे वसति लक्ष्मीः, कर मध्ये सरस्वती।
करमूले तू गोविंद: प्रभाते कर दर्शनम्।।
बातमी वाचा- Shani-Shukra Yuti: मकर राशीत दोन मित्र ग्रहांची होणार भेट, काय परिणाम होणार जाणून घ्या
मंत्राचा नेमका अर्थ काय?
तळहाताच्या अग्रभागी देवी लक्ष्मीचा वास आहे, मध्यभागी सरस्वती आणि मूळाशी भगवान विष्णुंचा वास आहे. सकाळी मी या देवतांचं दर्शन करतो. देवी लक्ष्मी धनाची देवता, देवी सरस्वती विद्येची देवता आणि भगवान विष्णु सृष्टीचे पालनकर्ते आहेत.