Navpanchak RajYog 2023: ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहांचं संक्रमण खूप महत्त्वाचं मानलं जातं. अनेकदा ग्रहांच्या राशी बदलामुळे राजयोग तयार होतो. दोन-तीन ग्रहांच्या संयोगाने राजयोगही तयार होतो. मात्र, अनेक राजयोग अत्यंत शुभ मानले जातात.  ज्या राशींवर राजयोगचा प्रभाव पडतो, त्यांचे निद्रिस्त नशीब प्रकर्ष होतं, असाच एक योग म्हणजे  नवपंचम राजयोग (Navpancham Rajyog)... गुरू आणि चंद्र यांच्या संयोगामुळे हा राजयोग 4 फेब्रुवारीला तयार झाला होता. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. (Astro Tips Navpancham raj yoga make these zodiac signs millionaires guru moon shine Jupiter moon conjunction)


मिथुन राशी (Gemini) - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन राशीच्या (Gemini) लोकांसाठी नवपंचम राजयोग एक नवी उमेद असेल. या राजयोगाचा चांगला परिणाम दिसून येईल. या दरम्यान नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. त्यांच्या आनंदाला उधाण येईल. त्याचबरोबर आत्मविश्वास देखील चांगला वाढेल. बराच काळ अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे.


कन्या राशी (Virgo) - 


कन्या राशीच्या (Virgo) लोकांसाठी हा योग खूप खास असणार आहे. व्यावसायाच्या दृष्टीने मोठा लाभ होण्याची शक्यता दिसते. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. जर तुम्ही आधी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर आता त्याचा फायदा मिळेल. त्याचबरोबर तुमच्या वैवाहिक जीवनात देखील आनंदी आनंद येईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत देखील मिळतील.


आणखी वाचा - Guru Gochar 2023 : 12 वर्षांनंतर मंगळाच्या राशीत गुरूचं संक्रमण; वर्षभर बसून खाल एवढा धनलाभ, नोकरी - व्यवसायातही प्रगती


मेष राशी (Aries) - 


गुरू आणि चंद्र यांनी मिळून तयार झालेला हा नवपंचम राजयोग (Navpancham Rajyog 2023) मेष राशीसाठी (Aries) चांगला आणि उत्तम ठरेल. कुठंही जा, नशिब तुमच्या सोबत असेल. त्यामुळे भौतिक सुखसोयी वाढतील, त्याबरोबर मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे घरात देखील आनंदाचं वातावरण असेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)