Guru Gochar 2023 : 12 वर्षांनंतर मंगळाच्या राशीत गुरूचं संक्रमण; वर्षभर बसून खाल एवढा धनलाभ, नोकरी - व्यवसायातही प्रगती

Jupiter Transit 2023 :   ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशीत गुरुचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशींचे लोक वर्षभर पैशात खेळणार आहेत.   

Updated: Feb 8, 2023, 08:24 AM IST
Guru Gochar 2023 :  12 वर्षांनंतर मंगळाच्या राशीत गुरूचं संक्रमण; वर्षभर बसून खाल एवढा धनलाभ, नोकरी - व्यवसायातही प्रगती
guru gochar 2023 Pisces Cancer Aries these zodiac sign people get lot of money Astro marathi news

Guru Gochar 2023 Date :  हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्वं आहे. कुडंली, तारे आणि ग्रह यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतं असतो. तुमच्या कुंडलीत कुठला ग्रह कुठल्या घरात आहे यावर तुमचं वर्तमान आणि भविष्य ठरलेले असतं. अवकाशात ग्रहांची हालचाल आपल्या आयुष्यात परिणाम करतात. कारण या हे ग्रह आपल्या कुंडलीतील राशीसोबत विराजमान होतात त्याचे परिणाम अशुभ आणि शुभ परिणाम दिसतात. 22 एप्रिलला मीन राशीतून बाहेर पडल्यानंतर मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनात शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीला गुरूचे संक्रमण धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती करणार आहे. (guru gochar 2023 Pisces Cancer Aries these zodiac sign people get lot of money Astro marathi news)

मेष (Aries Horoscope)

हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहेत. या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचा प्रगतीचा चढता आलेख असणार आहे. शिवाय जोडीदारासोबतच्या नात्यात बळ मिळेल. या काळात नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात अविवाहित लोकांनाही नातेसंबंधांचे प्रस्ताव मिळू शकतात. व्यावसायिकांसाठीही हा काळ नफा देऊन जाईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

कर्क (Cancer Horoscope)

गुरुचं संक्रमण कर्क राशीसाठी विशेषतः फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना घरी, नोकरी आणि कामाच्या ठिकाण मान वाढणार आहे. शिवाय त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होणार आहे. करिअर सुरू करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ आणि फलदायी असेल. अगदी तुम्हाला चांगल्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, व्यावसायिकांना नफा मिळविण्यासाठी चांगली संधी चालू येणार आहे. नोकरदार लोकांना या काळात पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope)

तर मीन राशीसाठी हा काळ खूप लाभदायक असणार आहे. हे संक्रमण राशीच्या दुसऱ्या घरात होणार आहे. हे घर आर्थिक स्थितीशी जोडलं आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे.  उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, अडकलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)