Brahma Muhurat Benefits : आजकाल उशिरापर्यंत काम केले जाते. त्यामुळे झोपही उशिरा होते. मात्र, पुरेशी झोप झाली नाही तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे रात्री लवकर झोपणे आणि सकाळी पहाटे उठणे हे केव्हाही चांगले असते. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगात ते शक्य नाही. तुम्हाला पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान जाग येते का? तर तुमच्यासाठी हा संकेत चांगला असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगली झोप ही आरोग्यासाठी चांगली असते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी व्यक्ती काय करत नाही. परिपूर्ण पलंगापासून ते खोलीच्या तापमान नियंत्रणापर्यंत लक्ष ठेवले जाते, जेणेकरून ते व्यक्ती चांगली झोपू शकेल आणि दुसऱ्या दिवशी ताजेतवाने जागी होईल. मात्र, अनेक वेळा लोक खूप लवकर उठतात म्हणजेच पहाटे  3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान उठतात. यानंतर काही करुनही झोप येत नाही. लवकर जागे होण्यामागे एक मोठे रहस्य लपलेले असू शकते. लवकर उठून घरातील देवतांची पूजा करायची असते. यावर्षी नागपंचमीला 'खास' मोठा योग; जाणून घ्या, 'तारीख आणि पूजा शुभ मुहूर्त आणि उपाय'


ब्रह्म मुहूर्ताची वेळ


ब्रह्म मुहूर्तावर उठणे सर्वोत्तम मानले जाते, हे तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल. मात्र, अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते. अशा परिस्थितीत तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की पहाटे 3 ते 4:30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. याला देवतांच्या उदयाचा काळ असेही म्हणतात. Yogini Ekadashi 2023 : 'या' राशींचं भाग्य उजळणार; पैशांचा पडणार पाऊस


ब्रह्म मुहूर्तावर उठणे शुभ 


अशा स्थितीत ब्रह्म मुहूर्तावर उठणे शुभ मानले जाते. यावेळी जाग येणे यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  3 ते 4:30  यावेळी जागे येणे म्हणजे देवतेला उठवून पूजा करायची आहे. यावेळी पूजन केल्याने प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते आणि त्याचे फायदेही दिसून येतात. माणसाच्या इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)