Budh Uday 2023 : 10 मे रोजी `या` शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार? बुधाचा उदय बनवू शकतो कोट्यधीश
Budh Uday 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 मे 2023 बुधवारी हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण यादिवशी बुधाचा उदय आणि मंगळ ग्रहाचा गोचर होणार आहे. त्यामुळे शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार आहे का चला जाणून घेऊयात.
Budh Uday 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि 9 ग्रहांना विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह आपली स्थिती बदलतो त्याचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. 10 मे 2023 बुधवारी बुध ग्रह उदयस्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्योदय उजळणार आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध 10 मे 2023 ला मेष राशीत गोचर करणार आहे. चला मग बुधदेवाताची तुमच्या राशीवर कृपा होणार का जाणून घ्या. (budh uday 2023 mercury rising these lucky zodiac signs)
मेष (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी बुध उदय भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. व्यावसायिकांना धनलाभ होणार असून हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांना बुधाचा उदय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. अनेक दिवासांपासून रखडलेली काम मार्गी लागणार आहे. व्यवसायिकांना या काळात धनलाभ होणार आहे. नवीन करार होण्याची शक्यता आहे. कल्पनेच्या जोरावर नवीन योजना आखाल. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. इच्छुकांचे लग्न ठरणार आहेत.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय प्रगती आणि आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. हा काळ त्यांचासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. वरिष्ठ्यांचा मदतीने नवीन कामास सुरुवात करणार आहात. धार्मिक कार्यात मन रमणार आहे.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना बुध उदय अतिशय फलदायी ठरणार आहे. तर्कशक्ती आणि वक्तृत्वावर तुमच्या प्रभाव वाढणार आहे. लेखकांना नवीन संधी मिळेल. गुंतवणूक ही तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढणार आहे.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी बुध उदय नशिबवान ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं चीज होणार आहे. प्रमोशन आणि इक्रींमेंट होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रखडलेली कामं सुरळीत पूर्ण होणार आहे. परदेश वारीचे योग आहेत.