Chanakya Niti : अशा लोकांवर विश्वास ठेवाल तर आयुष्यातून उठाल, तुमच्यावर येईल पश्चाताप करण्याची वेळ!
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये कोणत्या प्रकारच्या लोकांना लांब ठेवायचे याचा खुलासा केला आहे.
Chanakya Niti About Life : आचार्य चाणक्य हे (Chanakya) अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राचे उत्तम जाणकार होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणाच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्या सारख्या सामान्य मुलाला मगधचा सम्राट बनवलं आणि बलाढ्य धनानंदला हटवून गादीवर बसवलं. आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीमध्येही लोकांविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या नीती ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात अवलंबल्या त्या सगळ्यांनी आयुष्यात अनेक गोष्टी शिकल्या किंवा काही यशस्वी झाले, तर काहींची कधी फसवणूक होऊ शकली नाही. चाणत्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये कोणत्या व्यक्तींपासून लांब रहायचे या विषयी सांगितले आहे.
चोर
आचार्य चाणक्य म्हणतात की, चोर फक्त कोणाच्या घरात कोणतं सामान आणि पैसा आहे याची काळजी घेतो. चोरीचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याने त्याला अजिबात फरक पडत नाही. अशा लोकांना कोणाच्याही दु:खाची पर्वा नसते.
स्वार्थी
स्वार्थी लोक इतरांबद्दल कमी आणि नेहमी स्वतःबद्दल विचार करतात. एखाद्याला गरज असेल किंवा मदतीची गरज असेल तर हे लोक कधीच मदतीसाठी पुढे येत नाहीत. आचार्य चाणक्य म्हणतात की अशा लोकांपासून लांब रहा, कारण हे लोक विश्वासू नसतात.
राजा, शासन किंवा प्रशासन
जुन्या काळातील राजा असो वा आधुनिक काळातील शासन-प्रशासन असो. कोणाच्याही दु:खाची त्यांना पर्वा नसते. हे लोक कोणाच्याही भावना समजू शकत नाहीत. नेहमी नियम आणि पुराव्याच्या आधारे हे लोक निर्णय घेतात. चाणक्य नीतींनुसरा अशा लोकांपासून अंतर राखणे चांगले.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)