Eclipse Effect on Zodiac Signs:ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ग्रह आपल्या भ्रमण कालावधीनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. काही ग्रह एखाद्या राशीत दीर्घ कालावधीसाठी राहतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात. गोचर कुंडलीनुसार चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो, तर शनि अडीच, राहु-केतु दीड वर्षांनी राशी बदल करतात. त्यामुळे गोचर कालावधीत एका राशीत एका पेक्षा अधिक ग्रह एकत्र येतात. यामुळे शुभ-अशुभ योग तयार होतात. आज म्हणजेच 16 ऑगस्ट 2022 रोजी रात्री  9 वाजून 6 मिनिटांनी चंद्र आणि राहुची युती होणार आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 19 ऑगस्ट 2022 पर्यंत हा योग मेष राशीत असणार आहे. त्यामुळे पुढील सव्वा दोन दिवस काही राशींना काळजी घेणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्र ग्रह मनाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे राहुसोबत युती झाल्याने चंद्राला ग्रहण लागतं. यामुळे गोचर कुंडलीत चंद्र कमकुवत होतो. असं असलं तरी काही वेळेस हा योग काही राशींसाठी फलदायी ठरते. चला तर जाणून घेऊयात पुढील 57 तास कोणत्या राशींना फायदेशीर ठरतील.


  • मेष - पैसा आणि व्यवसायात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु आरोग्य आणि कुटुंबात थोडा तणाव राहील. मानसिक ताण व वाणीवर संयम ठेवणे हिताचे राहील. थंड पदार्थ खाणं टाळा. तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

  • वृषभ -पुढील दोन दिवस अनावश्यक प्रवास अजिबात करू नका. आपल्या प्रियजनांशी वाद टाळण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप न मिळाल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. 

  • कर्क- तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही चांगली बातमी मिळेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी करू नका, यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

  • सिंह - दोन दिवस सिंह राशीच्या लोकांना धीर धरावा लागेल कारण कामात अधिक अडथळे येऊ शकतात. धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. नोकरी आणि व्यवसायात बदल टाळावे लागतील.

  • कन्या - आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये विशेषत: सतर्क राहा. भूतकाळाच्या, भविष्याच्या चिंतनात मन व्यथित होऊ शकते, अशा परिस्थितीत वर्तमानात जगलेल्या काळाचा आनंद घ्यावा लागतो. पोटाचे आजार आणि कफ संबंधित समस्या येतील, त्यामुळे मांसाहार आणि मादक पदार्थ खाऊ नका.

  • तूळ - व्यवसाय आणि नोकरीसाठी वेळ चांगला राहील. तुम्हाला सन्मान मिळेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदाराच्या व्यवसायातील भागीदाराशी संबंध मजबूत असतील, परंतु छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये भांडण होण्याची शक्यता जास्त असेल. नवीन काही सुरू करण्यासाठी दोन दिवस शुभ राहतील. विशेषतः व्यवसायात लाभाची अपेक्षा अधिक दिसून येते.

  • वृश्चिक - चंद्र आणि राहुची युती संमिश्र परिणाम देईल. अफवांपासून दूर राहा, ऐकलेल्या गोष्टींवर विसंबून राहणे टाळा. व्यावसायिक  लाभ होण्याची शक्यता आहे. व्यर्थ गोष्टींपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे लागेल, गप्पाटप्पा आणि अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवू नये.

  • धनु - व्यावसायिक बाबींसाठी दोन दिवस खूप चांगले जाणार आहेत. प्रलंबित काम आणि ग्राहकांकडे अधिक लक्ष दिल्यास चांगला नफा कमावता येईल. नोकरी आणि अभ्यासात मुलास चांगले परिणाम अपेक्षित असतील. पोटाशी संबंधित आजारांबाबत सतर्क राहण्याचा राहणं आवश्यक आहे.

  • मकर - कोणत्याही प्रकारची टीका करणे टाळा, अन्यथा त्रास होऊ शकतो. या काळीत सर्वांशी सामंजस्याने वागण्याची गरज आहे. कामात मेहनत घ्यावी. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. दोन दिवस त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

  • कुंभ - तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला परदेशात जायचे असेल किंवा परदेशाशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर हे दोन दिवस योग्य आहेत. धार्मिक कार्यात रुची वाढेल, अशा परिस्थितीत धार्मिक यात्रा किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर ते करू शकता.

  • मीन - मीन राशीच्या लोकांच्या वाणीवर राहुचा प्रभाव पडेल. त्यामुळे या काळात वाणीवर ताबा ठेवा. या काळात दातांसंबंधी समस्या येऊ शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)