Horoscope 5 August : तुमची रास काही खास सांगतेय; एकदा पाहाच कसा असेल आजचा दिवस
पाहा आज कोणत्या राशीला मिळणार गुरुचं बळ
मेष- नवी नोकरी मिळण्याची संधी आहे. करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचं शिक्षण घेण्याचा निर्णय घ्याल. सायंकाळपर्यंत धनलाभ होणार आहे. आज करड्या रंगाचं वस्त्र परिधान करा.
वृषभ- आरोग्य सुधारेल. धनलाभ होण्याचा योग असला तरीही आज तोटा होण्याचीही शक्यता आहे. महत्त्वाची कामं उरका.
मिथुन- नातेवाईकांशी उगाचा वाद घालू नका. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. एखादा मित्र भेटण्याची शक्यता आहे.
कर्क- महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा. आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. सायंकाळपर्यंत एखादा प्रवासयोग आहे.
सिंह- नोकरीच्या ठिकाणी एखादी शुभवार्ता मिळणार आहे. घरातील वातावरण अल्हाददायक असेल.
कन्या- व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यासावर लक्ष द्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
तुळ- विचार चांगले ठेवा. व्यापारात लाभ होणार आहे. अडचणी दूर होणार आहेत. धनलाभाचा योग आहे पण, चुकीचा मार्ग निवडू नका.
वृश्चिक- कुटुंबात एखादी आनंदवार्ता कळणार आहे. दुपारच्या वेळी काहीशी धावपळ होईल. कोणत्याही वादात अडकू नका.
धनू- संतानसुख मिळणार आहे. मोठ्यांचा आदर करा. आज तुम्हाला मिळालेले आशीर्वाद फळणार आहेत.
मकर- आपल्या माणसांशी असणारे वाद मिटतील. दुरावा कमी होईल, कुटुंबात आनंद नांदेल. गोड पदार्थ दान करा. आज तुमच्या राशीला गुरुचं बळ मिळणार आहे.
कुंभ- कोणालाही पैसे उधार देऊ नका. व्यावसायिकांना बक्कळ नफा होणार आहे. मसालेदार पदार्थ टाळा.
मीन- प्रवासयोग आहे. जुने मित्र भेटणार आहेत. एखादी शुभवार्ता कळणार आहे. पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करा.