मेष- एखाद्या नव्या कामाला प्रारंभ कराल, तसेच जुनी कामेही मार्गे लागतील. मित्र आणि आप्तेष्टांकडून सहकार्य मिळेल. मालमत्तेच्या व्यवहारांकडे लक्ष द्या. व्यवसायात नफा होण्याची शक्यता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- नकारात्मक विचार करत राहाल तर महत्त्वपूर्ण संधी गमावून बसाल. आजच्या दिवसात तातडीने कोणताही निर्णय गेऊ नका. विचारपूर्वक बोला, इतरांचे ऐकून घ्या. 


मिथुन- नोकरी किंवा धंद्यात एखादा नवा प्रस्ताव समोर येऊ शकतो. समस्या सोडवण्यासाठी उत्तम दिवस. महत्त्वाच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनुकूल ग्रहमान.


कर्क- प्रेमसंबंधात गैरसमज होण्याची शक्यता. कोणत्याही गोष्टीत गाफील राहू नका. नोकरी किंवा व्यवसायात घाईगडबडीने निर्णय घेणे टाळा. 


सिंह- नियोजित कामे मार्गी न लागल्यामुळे गोंधळात पडाल. पैशांची देवाणघेवाण किंवा गुंतवणूक करताना काळजी घ्या. नव्या कामाला प्रारंभ करण्याच्या फंदात पडू नका. जुन्या कामांवरच लक्ष केंद्रित करा. 


कन्या- व्यवसायात नवे प्रस्ताव समोर येतील. जोडीदाराकडून सुख आणि सहकार्य लाभेल. एखादी नवी कल्पना डोक्यात येईल. मात्र, तुर्तास जुन्या कामांवरच लक्ष केंद्रित करा. 


तूळ- आजचे ग्रहमान अनुकूल. त्याचा फायदा घेऊन आपला कार्यभाग साधा. जोडीदाराकडून एखादे सरप्राईज मिळण्याची शक्यता. 


वृश्चिक- नोकरी किंवा व्यवसायात तातडीने काही निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होईल किंवा गोंधळ वाढेल. विनाकारण एखाद्या गोष्टीवर उधळपट्टी होण्याचीही शक्यता. तणावपूर्ण परिस्थितीतून सावधपणे मार्ग काढा. 


धनु- आर्थिक समस्या सुटतील. वैवाहिक जीवनात सुख अनुभवाल. एखादे प्रलंबित काम समंजसपणा आणि नम्रतेने बोलणी करून मार्गी लावाल. 


मकर- आज काही स्वार्थी लोकांमुळे तुमच्यासमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता. त्यामुळे सतर्कता बाळगा. एखादे जुने प्रकरण अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे मानसिक ओढाताण होईल. समस्यांचे तातडीने निराकरण होणार नाही.


कुंभ- नोकरीत स्वत:वर नियंत्रण ठेवा, नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता. नव्या योजना आखण्यासाठी उत्तम दिवस. आरोग्याची काळजी घ्या. 


मीन- व्यवसायात काही नवे करण्याच्या नादात एखादी अडचण उभी राहू शकते. मानसिक चिंतेमुळे कामात लक्ष लागणार नाही. जोखीम पत्कारण्याच्या फंदात पडू नका.