Horoscope 10 April 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी एखादा असा प्रवास घडेल ज्याचा येत्या काळात फायदा होणार आहे. जवळची नाती आणखी दृढ होतील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नव्या संधी मिळतील. सगळं लक्ष हे कामावर आणि करिअरवर असेल. नव्या गुंतवणुकीचे बेत आखाल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी आर्थिक परिस्थिती सुधारेल. एखादा लहानसा प्रवास करावा लागू शकतो.  नोकरी आणि व्यापाराच्या ठिकाणी नव्या संकल्पना अंमलात आणाल. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी काही नव्या जबाबदाऱ्यांचं ओझं तुमच्यावर असेल. कोणा एका नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल. निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामात यश मिळेल. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी नकारात्मक पद्धतीने विचार करु नका. मोठा निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी बोलताना तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. अनेक दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी काम करताना तणावपूर्ण वातावरण असू शकतं. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात फायदा होणार आहे.  


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नव्या व्यक्तींची भेट घडू शकते. एखाद्या दूरच्या नातेवाईकाला भेटण्याचा योग आहे. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी आर्थिकदृष्ट्या होणारा फायदा मोठा असेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी जीवनसाथी सोबत वेळ व्यतीत कराल. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारांविषयी चर्चा करु नका. अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )