Horoscope 17 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता अजिबात ठेवू नका. आज काही जुने प्रश्न सुटणार आहेत.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नोकरीत अधिकाऱ्यांनी केलेल्या कोणत्याही चुकीच्या कामाला हो म्हणू नये. आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी वाढतील.  


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी तुमच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहणार आहे. काहीतरी नवीन करण्याची इच्छा अडचणीत आणून शकते.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये. वाहन चालवताना काळजी घ्यावी.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी विनाकारण वादात पडू नये. रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी नवीन कामासाठी गेलात तर त्यामध्ये आई-वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाद झाल्यास शांत राहा. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी पैशाशी संबंधित काही मदत हवी असल्यास जवळच्या मित्राची मदत घ्या. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी तुमचं सर्वात मोठं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. पुढे जाण्याच्या शुभ संधी उपलब्ध होणार आहेत. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी स्त्री वर्गाकडून काही नुकसान होईल किंवा त्यांच्याशी काही कारणाने वाद होण्याची शक्यता आहे. घाईत कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागणार आहे. जुन्या चुकीपासून काहीतरी शिकले पाहिजे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी वैयक्तिक आयुष्यात तुमच्या काही जबाबदाऱ्या वाढणार आहेत. ध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तीचा सहवास मिळणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )