Horoscope 21 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. आज तुमची रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. काही नवीन काम सुरू करणेही तुमच्यासाठी फायदेशीर राहील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी कोणतीही महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा टाळावा.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मुलांच्या लग्नाशी संबंधित कोणताही प्रस्ताव आज येऊ शकतो. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती खूपच तंगीची असेल. व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असू शकतो. तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना कामानिमित्त प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. घरातील सदस्यांबरोबर तुमचा वाद होऊ शकतो. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी अविवाहित लोकांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आज कोणत्याही प्रकारचा लांबचा प्रवास करू नका. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुमचे कुटुंबीय तुमच्यावर खूप आनंदी असतील. तुम्हाला पैशाशी संबंधित कोणतीही अडचण येणार नाही.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कार्यक्षेत्रात कोणतेही नवीन बदल करू नका. तुम्हाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )