Horoscope 9 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नये. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता विरळ आहे. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. सकारात्मक विचारांमुळे तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडून येणार आहेत.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी मिळालेल्या वेळेचा योग्य आणि चांगला उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी साठवलेल्या पैशांमधून विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. परिवारात ऐकी ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवावा.  


सिंह (Leo)


आजचा दिवशी विचार केलेली कामं सहजपणे पूर्ण होणार आहेत. गरजेचे आणि महत्त्वाचे मोठे निर्णय घेऊ शकता. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी नवीन काम हाती घेऊ शकता. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्ती आज मनातील गोष्ट खास व्यक्तीशी शेअर करु शकतात.  वैवाहिक जीवन सुखी राहणार आहे. नातेवाईकांची मदत मिळण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी मोठ्या व्यक्तींशी महत्त्वाचं बोलणं होण्याची शक्यता आहे. नफा कमावण्यासाठी आजचा दिवस खास आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी अचानक आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. कलात्मक कामांमध्ये तुम्हाला आवड निर्माण होऊ शकते. नातेवाईकांसोबत असलेल्या नात्यात सुधारणा होईल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी वेळेचा सदुपयोग केल्यास भविष्यात अधिक लाभ मिळू शकतो. आज काही निर्णय हे तुमच्या बाजूने जाणार आहेत.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कौटुंबिक वादामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)