New Year 2024 Upay:नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही शंकराची पुजा केल्यानं आणि चंद्र कवच पठण केल्यानं मनाला सकारात्मक उर्जा मिळते आणि त्या सोबतचं तुमची असलेल्या श्रद्धेला फळं मिळतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववर्ष म्हणजेच 2024 सोमवारपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी शंकराची पूजा आणि उपासना केली जाते. शास्त्रानुसार जो व्यक्ती सोमवारी पूर्ण भक्तिभावाने  शंकराची पूजा आणि उपवास करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रहही बलवान होतो.



ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. यामुळे व्यक्तीला जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते. मानसिक तणावाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला कुंडलीत चंद्र बलवान करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हालाही येत्या वर्षात मानसिक तणावापासून दूर राहायचं असेल, तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी  शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा. यासोबतच पूजेदरम्यान चंद्र कवचही पाठ करा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणावापासून आराम मिळेल. 


चंद्र कवच संपूर्ण पाठ येथे वाचूया.


चंद्र कवच 
समं चतुर्भुजं वन्दे केयूरमुकुटोज्ज्वलम् ।
वासुदेवस्य नयनं शंकरस्य च भूषणम् ॥
एवं ध्यात्वा जपेन्नित्यं शशिनः कवचं शुभम् ।
शशी पातु शिरोदेशं भालं पातु कलानिधिः ॥
चक्षुषी चन्द्रमाः पातु श्रुती पातु निशापतिः ।
प्राणं क्षपाकरः पातु मुखं कुमुदबांधवः ॥
पातु कण्ठं च मे सोमः स्कंधौ जैवा तृकस्तथा ।
करौ सुधाकरः पातु वक्षः पातु निशाकरः ॥
हृदयं पातु मे चंद्रो नाभिं शंकरभूषणः ।
मध्यं पातु सुरश्रेष्ठः कटिं पातु सुधाकरः ॥
ऊरू तारापतिः पातु मृगांको जानुनी सदा ।
अब्धिजः पातु मे जंघे पातु पादौ विधुः सदा ॥
सर्वाण्यन्यानि चांगानि पातु चन्द्रोSखिलं वपुः ।
एतद्धि कवचं दिव्यं भुक्ति मुक्ति प्रदायकम् ॥
यः पठेच्छरुणुयाद्वापि सर्वत्र विजयी भवेत् ॥


चंद्र स्तोत्र
श्वेताम्बर: श्वेतवपु: किरीटी, श्वेतद्युतिर्दण्डधरो द्विबाहु: ।
चन्द्रो मृतात्मा वरद: शशांक:, श्रेयांसि मह्यं प्रददातु देव:।।
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम ।
नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम ।।
क्षीरसिन्धुसमुत्पन्नो रोहिणी सहित: प्रभु: ।
हरस्य मुकुटावास: बालचन्द्र नमोsस्तु ते ।।
सुधायया यत्किरणा: पोषयन्त्योषधीवनम ।
सर्वान्नरसहेतुं तं नमामि सिन्धुनन्दनम ।।
राकेशं तारकेशं च रोहिणीप्रियसुन्दरम ।
ध्यायतां सर्वदोषघ्नं नमामीन्दुं मुहुर्मुहु: ।।


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)