Shash/Ravi/Gajakesari Yog : आजचा सोमवार अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. उत्तर भारतीयांचा सावन महिना सुरु झाला असून आज त्यांचा पहिला सावन सोमवार आहे. आजचा दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ योगायोग घडणारा ठरणार आहे. गुरु आणि चंद्र यांच्या मिलनाने अत्यंत शुभ असा गजकेसरी योग तयार होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने अनेक राजयोग जुळून आले आहेत. शश योग, लक्ष्मी नारायण योग हे काही राशीच्या आयुष्यात धनसंपदा प्रदान करणार आहेत. या राशींवर भोलेनाथाची विशेष कृपा बसरणार आहे. (gajkesari yog 2023 today will shower money to 5 zodiac signs shravan Sawan Somwar)


धनु (Sagittarius)


या राशीच्या लोकांना व्यवसात मोठं यश प्राप्त होणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फलदायी असणार आहे. सकारात्मक घडामोडी घडणार असून आनंदाची बातमी मिळणार आहे. आज पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करुन भोलेनाथाला केशरयुक्त दुधाने अभिषेक करा.



मेष (Aries)


या राशींसाठी आजचा दिवस अतिशय खास असणार आहे. कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. या लोकांनी लाल रंगाच्या फुलांनी शंकराची पूजा करावी. तर दुध आणि मधाने अभिषेक करावा. 



सिंह (Leo)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. पगारवाढचे शुभ संकेत आहेत. शिवाय कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. चंदनाच्या पाण्याने शंकराला अभिषेक करा. 



तूळ (Libra)


या राशीच्या लोकांसाठी आनंदच आनंद घेऊन आला आहे. करिअरमध्ये यशासोबतच तुम्ही प्रगतीचे नवीन शिखर गाठणार आहात. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. नोकरीच्या संधी मिळणार आहेत. भोलेनाथाला गाईचे तूप, सुंगधी तेल आणि दुधाचा अभिषेक करा. 


मीन (Pisces)


या राशीच्या लोकांना भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. कामानिमित्त प्रवासचे योग आहेत. केशरयुक्त पाण्याने भोलेनाथाला अभिषेक करणं तुम्हाला फलदायी ठरेल. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांना भोलेनाथाची विशेष कृपा असणार आहे. करिअरमध्ये प्रगती साधणार आहे. बँक बलेन्स मजबूत स्थितीत येणार आहे. मध आणि पाण्याने भोलेनाथाची पूजा तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. 


 


हेसुद्धा वाचा -  Weekly Money Horoscope : 'या' राशींसाठी सुख समृद्धीचा योग! तुमच्या नशिबात धनलाभ?


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)