Weekly Money Horoscope : 'या' राशींसाठी सुख समृद्धीचा योग! तुमच्या नशिबात धनलाभ?

Weekly Money Horoscope 10 t0 16 July 2023 : आजपासून नवीन आठवड्याला सुरुवात झाली असून आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Jul 10, 2023, 07:23 AM IST

Money Horoscope Weekly 10 t0 16 July 2023 : सूर्य आणि बुध ग्रहाचं संक्रमण हे अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. सुख समृद्धीसह धनलाभाचे योग सहा राशींच्या नशिबात आहे.  आर्थिकदृष्ट्या आणि करिअरसाठी हा आठवडा कसा असेल जाणून साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.

1/13

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

सूर्य आज मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर ग्रहांचा राजकुमार बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. अशात दोन ग्रहांची युती होणार आहे. यातून बुधादित्य योग तयार होतो आहे. त्यात आज चंद्र आणि गुरुची युती होणार असून त्यामुळे गजकेसरी योग जुळून आला आहे. 

2/13

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना आठवड्याच्या मध्यंतरी कामात यश प्राप्त होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम प्रकरणात तुम्ही व्यस्त असाल. आठवड्याच्या शेवटी मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. 

3/13

वृषभ (Taurus)

आर्थिकदृष्ट्या हा आठवडा या राशीसाठी चढ उताराचा असणार आहे. खर्च अधिक होणार आहे. या आठवड्यात आर्थिकबाबत कौटुंबिक सहकार्य लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहणार आहात. कामानिमित्त बाहेर गावी जावं लागणार आहे. 

4/13

मिथुन (Gemini)

या राशीसाठी सुख समृद्धीचे संयोग जुळून आले आहे. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा लकी ठरणार आहे. आर्थिकदृष्टी तुम्हाला लाभच लाभ होणार आहे. आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. लव्ह लाइफ थोडी तणावग्रस्त असणार आहे. 

5/13

कर्क (Cancer)

आर्थिकदृष्ट्या हा आठवडा या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. अचानक कुठूतरी तुम्हाल धनलाभ होणार आहे. कुटुंबात काही वादावादी होण्याची शक्यता आहे. सांमज्यसाने व्यवहार करा. या आठवड्यात प्रेम संबंध मजबूत होतील. आठवड्याच्या शेवटी मनं अस्वस्थ राहील. 

6/13

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीची ठरणार आहे. तुमचं बँक बलेन्स चांगल्या स्थितीत येणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून तुम्हाला बाहेरगावी जावं लागणार आहे. या आठवड्याच आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील वस्तूंची या आठवड्यात तुम्ही खरेदी करणार आहेत. 

7/13

कन्या (Virgo)

या राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या धनलाभाचा आहे. अनेक मार्गाने तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. आरोग्याच्या समस्याही या आठवड्यात मार्गी लागणार आहेत. लव्ह लाइफबद्दल सकारात्मक घडामोड घडणार आहे. कामानिमित्त बाहेर गावी जावं लागणार आहे. 

8/13

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना सुख समृद्धीचे शुभ योगायोग जुळून आला आहे. आर्थिक लाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे. प्रेम जीवनातही शुभ योग जुळून आला आहे. कामाच्या ठिकाणी व्यस्त असणार आहात. कोणत्यातरी बातमीने मन अस्वस्थ राहणार आहे. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या आर्थिकदृष्ट्या प्रगतीची असणार आहे. सुख समृद्धीचे शुभ संयोग जुळून आला आहे. प्रेम जीवनातही आनंद वाढणार आहे. आरोग्याच्या थोड्या समस्या उद्ध्भवणार आहे. करिअरमध्ये यश संपादन करणार आहात. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढणार होणार आहे. घरात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. बँक बलेन्स वाढणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम जीवनात हा आठवडा परस्पर संबंध मजूबत करणारा ठरणार आहे. 

11/13

मकर (Capricorn)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी आनंददायी असणार आहे. प्रेम जीवनात आनंदच आनंद असणार आहे. कार्यक्षेत्रात थोड्या अडचणी वाढणार आहेत. कोर्टकचेरीचे प्रकरण मागे लागू शकतं. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कठीण असणार आहे. आठवड्याच्या शेवटी मनं उदास राहील. 

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. या आठवड्यात आरोग्यात सुधारणा होईल. कामानिमित्त बाहेरगावी जाणं तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. प्रेम जीवनात मनं अस्वस्थ राहणार आहे. हा आठवडा खर्च ठरणार आहे. 

13/13

मीन (Pisces)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रगतीची ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होमार आहे. प्रेम जीवनात नातं मजबूत करणार हा आठवडा ठरणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)