सुखी आयुष्यासाठी जपा गरुड पुराणातील 5 मंत्र, सर्व दु:ख क्षणात होतील दूर
सुखी आयुष्याचा मंत्र शोधताय?
मुंबई : हिंदू धर्म ग्रंथात काही पुराणांना महत्त्वं आहे. या 18 पुराणांपैकी एक म्हणजे, गरुड पुराण. व्यक्तिला त्याच्या कर्मानुसार फळं मिळण्याचा उल्लेख या पुराणात करण्यात आला आहे. आयुष्यात यश आणि प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी गरुड पुराणात बरेच मंत्र देण्यात आले आहेत. त्यातच सर्वाधिक लक्ष वेधणारे मंत्र आहेत आयुष्यात सुखाची बरसात करणारे. तुम्ही कधी पाहिले आहेत का, हे मंत्र? (garuda purana tips mantra for happy life)
गरुड पुराणातील हे मंत्र म्हणजे काही अशा शिकवणी आणि सल्ले, जे तुमच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी देतील. (Happiness mantra )
- पती पत्नीच्या नात्यात विश्वासाचा अभाव आल्यास कुटुंब तुटतं. त्यामुळं विश्वासाला तडा जाईल, असं कोणतंही काम करु नका, परिस्थितीअनुरुप निर्णय घ्या, असं गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे.
अधिक वाचा : Astro Tips: मोफत किंवा उधारीत घेतलेल्या या गोष्टीमुळे येतं आर्थिक संकट!
- असं म्हणतात, की आयुष्याचं पहिलं सुख म्हणजे निरोगी काया. अर्थात निरोगी शरीर. शरीर सुस्थितीत असल्यास तुम्हीही सर्व कामांसाठी सक्षम असता. पण, शरीराला त्रास होत असल्यास मात्र तुमचे प्रयत्न व्यर्थ. तुमच्या जोडीदाराला काही त्रास असेल, तर त्याची सेवा करा, त्याला किंवा तिला आजारपणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, पाहा नियतीही तुम्हाला साथ देईल.
- सुखी जीवनाच्या शोधात असणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर आपल्या बाळाला चांगले संस्कार द्या. मोठ्यांचा आदर करायला शिकवा.
- एखाद्या व्यक्तीशी वाद झाल्यास, अनावधानाने तुमचा अपमान होतो आणि तुम्हाला प्रचंड यातना होतात. पण, आपल्याहून लहान असणाऱ्यांशी शक्यतो वाद टाळा.
- प्रयत्न करुनही एखादं काम न झाल्यास त्यामुळं प्रचंड त्रास होतो. अशा वेळी तुमचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. चूक कुठे घडली, त्याचं कारण शोधा. नव्यानं प्रयत्न करा, नकारात्मकतेचा तुमच्या जीवनात थारा देऊ नका.
(वरील माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)