Astro Tips: मोफत किंवा उधारीत घेतलेल्या या गोष्टीमुळे येतं आर्थिक संकट!

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक बाबींचा आपल्यावर परिणाम होत असतो, असं या शास्त्रात सांगितलं आहे

Updated: Aug 21, 2022, 02:52 PM IST
Astro Tips: मोफत किंवा उधारीत घेतलेल्या या गोष्टीमुळे येतं आर्थिक संकट! title=

Money Related Astro Tips: ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक बाबींचा आपल्यावर परिणाम होत असतो, असं या शास्त्रात सांगितलं आहे. वास्तुशास्त्रात घरातील वस्तू आणि दिशांबाबत सांगितलं गेलं आहे. तर ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या गोचर आणि कुंडलीतील स्थान याबाबत मांडणी केली आहे. त्याचबरोबर काही धार्मिक कुलाचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतात.  दररोज आपण अनेक गोष्टी कळत नकळत करत असतो, यामुळे भविष्यात समस्या निर्माण होतात. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वस्तू फुकट किंवा दुसऱ्याकडून उधार घेऊ नयेत. यामुळे आपल्या आर्थिक संकटात वाढ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी कोणत्या आहेत.

मीठ- आपल्या दैनंदिन गोष्टींचा परिणाम आपल्या ग्रहांवर होतो. अनेक वेळा आपण नकळत अशा गोष्टी करतो, ज्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह अशुभ होतात. यापैकी एक म्हणजे मीठ. होय, असे मानले जाते की मीठ कधीही उधार घेऊ नये किंवा कोणाकडून फुकट घेऊ नये. पैसे देता येत नसतील तर त्याऐवजी दुसरे काही देता येईल, अशी योजना करा. कोणाकडूनही फुकटात मीठ घेणे शुभ मानले जात नाही. मीठ दुसऱ्या व्यक्तीकडून उधार घेतल्यास कुंडलीतील शनि ग्रह कमकुवत होतो.

मोहरीचे तेल- कधी कधी आपल्याला गरज असते तेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांकडून आवश्यक वस्तू घेतो. अशा परिस्थितीत मोहरीचे तेल घेणेही टाळावे. ज्योतिषशास्त्रात दुसऱ्या व्यक्तीकडून मोहरीचे तेल घेणे निषिद्ध आहे. जर तुम्ही एखाद्याकडून मोहरीचे तेल फुकटात घेतले तर ते तुमच्या शनिदोषाचे कारण ठरू शकते. इतकंच नाही तर त्या व्यक्तीच्या परस्पर संबंधातही दुरावा येतो.

सुईधागा- याशिवाय कोणाकडूनही सुई-धागा घेऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकतो. एखाद्याकडून फुकटात सुईचा धागा घेतला तर नात्यात कटुता निर्माण होते आणि घरगुती समस्या निर्माण होऊ लागतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)