Gudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर
Gudi Padwa 2024 : आला सण गुढीपाडव्याचा...हिंदू नवं वर्ष म्हणजेच मराठी नूतन वर्ष...हिंदू नवं वर्षाचं स्वागत भारतात वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाचं स्वागत हे गुढी उभारुन करण्यात येतं. यंदा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधीसह कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं जाणून सर्व माहिती एका क्लिकवर
Gudi Padwa 2024 : हिंदू नववर्षाचं स्वागत देशभरात मोठ्या उत्साहात करण्यात येतं. महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे मराठी नवं वर्षाला गुढी उभारुन करण्यात येतं. या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं. दारोदारी रांगोळी, दाराला आंब्याची पान आणि अशोकाची पान आणि फुलांचं तोरण, मराठ मोळा साज आणि उंच अशी गगणाला भिडणारी गुढी उभारण्यात येते. नैवेद्यासाठी श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. अनेक ठिकाणी गुढीपाडव्या निमित्त शोभा यात्राचे आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शोभा यात्रा पाहण्यासाठी तर परदेशातूनही पाहुणे येतात. असा गुढीपाडव्याचा सणाबद्दल संपूर्ण माहिती, पूजा विधी आणि साहित्याबद्दल जाणून घ्या. (gudi padwa 2024 09 April hindu new year Gudi Padwa shubh muhurat direction of gudi puja vidhi puja time know about in marathi)
गुढी पाडवा तिथी (Gudi Padwa 2024 Shubh Muhurta)
पंचांगानुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल 2024 ला रात्री 11 वाजून 50 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 ला रात्री 8 वाजून 30 मिनिटपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी 9 एप्रिलला साजरा केला जाणार आहे.
यंदा गुढी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? (Gudi Pujan Shubh Muhurta 2024)
मंगळवारी 9 एप्रिलला सकाळी 06:02 ते 10:17 मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे.
गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य
वेळूची काठी
कडुलिंबाचा पानं
आंब्याची पानं
दोन तांब्याचे कलश
काठापदराची साडी
ब्लाऊज पीस
साखरेचा हार
खोबऱ्याचा हार
लाल कलरचा धागा
चौरंग किंवा पाठ
फुलांचा हार
हेसुद्धा वाचा - Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा
गुढी उभारण्यासाठी पूजा साहित्य
कलश
हळदी
कुंकू
तांदूळ
पाणी
पंचामृत
साखर
पिवळे चंदन
अक्षदा
थोडीशी फुलं
आरती
कापूर
अगरबत्ती किंवा धूप
लक्ष्मी मातेची नाणी
सुपारी
पानं
सुपारी
हेसुद्धा वाचा - Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय
गुढी उभारण्यासाठी पूजा विधी (How to do Gudhi Pujan)
शुभ मुहूर्तावर गुढी उभारण्यासाठी उंच बांबूच्या काठीला प्रथम तिळाचं तेल लावून त्यानंतर पाण्याने शुद्ध करावं. त्यानंतर काठीच्या वरच्या टोकाला स्वच्छ वस्त्र किंवा साडी चोळी, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधावी. त्यावर चांदी किंवा तांब्याचं कलश उपडा ठेवावं. ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार आहेत तिथे चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर नारळ ठेवून कलशाची स्थापना करावी. त्यानंतर यावर तुमची मानाची गुढी उभारावी. आता गुढीला अष्टगंध, हळद कुंकू लावा. आता श्रीखंड पुरी, आंबाचा रस किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा.
कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ?
गुढी पाडव्याला गुढी ही दाराच्या उजव्या बाजूला उभारणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते.
हेसुद्धा वाचा - Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
गुढी पाडव्याला ही कामं नक्की करा!
गुढीपाडव्याला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करुन देवाची विधीवत पूजा करणे शुभ मानले जाते.
गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या पाट किंवा चौरंगावर पांढरा कपडा टाकावे.
त्या पांढऱ्या कपड्यावर हळदीकुंकाने अष्टकोनी कमळ तयार करावा.
कमळाच्या मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती पूजा करणे शुभ मानले जाते.
गुढी पाडव्याला गणपतीची पूजा नक्की करा. त्यासोबतच ‘ओम ब्रह्मणे नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करा.
गुढी पाडव्याला कडुलिंबाच्या पानाची मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी आणि साखर घालून चटणी बनवा आणि त्याचं सेवन करा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)