Guru Margi In Meen Rashi 2022: प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. मात्र सूर्य (Sun) आणि चंद्र (Moon) हे दोन ग्रह सोडले बाकी सात ग्रह वक्री अवस्थेत जातात. त्यामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होतो. देवगुरू बृहस्पती (Guru Grah) सध्या वक्री अवस्थेत आहे. गुरु ग्रहाला ज्ञान, विवाह, धन, सौभाग्याचा कारक मानलं जातं. कुंडलीत गुरु चांगल्या स्थितीत असल्यास जातकांना चांगली फळं मिळतात. सध्या गुरु ग्रह मीन राशीत वक्री स्थितीत आहे. आता 3 दिवसानंतर म्हणजेत 24 नोव्हेंबर 2022 पासून गुरु मार्गस्थ होणार आहे. 24 नोव्हेंबरला सकाळी 4 वाजून 36 मिनिटांनी मीन राशीत मार्गस्थ होमार आहे. त्यामुळे या काही राशींची आर्थिक स्थिती आणि विवाह जमण्यास अनुकूल काळ आहे. चला तर जाणून घेऊयात या स्थितीचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ (Vrushabh)- गुरु ग्रह मीन राशीत मार्गस्थ होणार असल्याने या राशीसाठी शुभ राहील. अडकलेली कामं पूर्ण होतीत. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. त्याचबरोबर धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. तसेच पगारवाढ आणि पदोन्नती मिळेल. नवीन नोकरीची ऑफर देखील या काळात येऊ शकते. तसेच विवाहासाठी अनुकूल वेळ आहे.


कर्क (Kark)- या राशीसाठी मार्गस्थ गुरु फलदायी ठरणार आहे. समाजात मानसन्मान आणि कतृत्वाची छाप पडेल. करिअरमध्ये नवी संधी मिळेल. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. जीवनात सुख समृद्धी वाढेल. व्यापार आणि लव्ह लाईफमध्ये चांगला परिणाम दिसून येईल. जोडीदारासोबत संबंध दृढ होतील.


वृश्चिक (Vrushchik)- मीन राशीतील मार्गस्थ गुरु या राशीसाठी चांगले दिवस घेऊन येणार आहे. या काळात प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्योगपतींना या काळात फायदा होईल. मेहनतीला पूर्ण फळ मिळेल. म्हणजेत नशिबाची चांगली साथ मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे. 


बातमी वाचा- बाबा वेंगापेक्षा 'या' व्यक्तीनं वर्तवलं धक्कादायक भाकीत! डिसेंबरमध्ये घडणार अशी घटना की...


मीन (Meen)- या राशीतच गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहे. गुरु ग्रह मीन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीला या स्थितीचा चांगलाच फायदा होणार आहे. या काळात अडचणींचा भार कमी होईल. प्रत्येक क्षेत्रात सुख आणि समृद्धीचे योग जुळून येतील. या काळात लग्नदेखील जुळतील. तसेच धार्मिक कार्यात रुची वाढेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)