बाबा वेंगापेक्षा 'या' व्यक्तीनं वर्तवलं धक्कादायक भाकीत! डिसेंबरमध्ये घडणार अशी घटना की...

बाबा वेंगा आणि नास्त्रदेमस या भविष्यवेत्त्याबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. कारण या भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेली काही भाकीतं खरी ठरल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढे काय होणार? काय भाकीत वर्तवलं आहे? याबाबत कायम आकर्षण राहिलं आहे. दुसरीकडे ट्राइम ट्रॅव्हलबाबतही असंच काहीसं बोललं जातं आहे. 

Updated: Nov 20, 2022, 08:42 PM IST
बाबा वेंगापेक्षा 'या' व्यक्तीनं वर्तवलं धक्कादायक भाकीत! डिसेंबरमध्ये घडणार अशी घटना की... title=

Time Traveller Prediction Of December 2022: बाबा वेंगा आणि नास्त्रदेमस या भविष्यवेत्त्याबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. कारण या भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेली काही भाकीतं खरी ठरल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढे काय होणार? काय भाकीत वर्तवलं आहे? याबाबत कायम आकर्षण राहिलं आहे. दुसरीकडे ट्राइम ट्रॅव्हलबाबतही असंच काहीसं बोललं जातं आहे. टाइम ट्रॅव्हल हा या विषयावर जगभरात अनेक विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात या कथांना कोणताही बेस नाही. पण या विषयात शास्त्रज्ञांपासून सर्वसामान्यांना रस आहे. वेळोवेळी टाइम ट्रॅव्हलबाबत नवनवीन दावे समोर येत आहेत. आता असाच एक दावा समोर आला असून चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा दावा ईनो एलरिक (Eno Alric) नावाच्या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीचा दावा आहे की तो 2671 वर्षातून परतला आहे.ईनो एलरिक सोशल मीडियावर 'थेरेडियंटटाइम ट्रॅव्हलर' म्हणून प्रसिद्ध आहे. 8, 12 आणि 25 डिसेंबर रोजी पृथ्वीवर काहीतरी मोठे घडणार आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

20 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये केला दावा 

मिररच्या रिपोर्टनुसार, ईनो एलरिचने आपल्या 20 सेकंदांच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये हा दावा केला आहे. रिपोर्टनुसार, 20 डिसेंबर रोजी त्यांनी याला 'द रिलीज' असे संबोधले आहे. तुम्ही या चार तारखा लक्षात ठेवल्या पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे. एलरिकने या आधीही असे दावे केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एलरिकने असाच दावा केला होता. सहा महिन्यांत तो आठ जणांना टाइम ट्रॅव्हलच्या माध्यमातून त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतो, असं त्याने सांगितलं होतं.

बातमी वाचा- Dream Science: अशी स्वप्न देतात भविष्याबाबत शुभ संकेत, नेमका अर्थ काय? जाणून घ्या

कादंबरीमुळे टाइम ट्रॅव्हल बाबत चर्चा

टाईम मशीनची कल्पना एच.जी. वेल्स यांनी 1895 मध्ये कादंबरी मांडली होती. तेव्हापासून ही कल्पना लोकांच्या कुतुहलाचा विषय बनून राहिली आहे. टाईम ट्रॅव्हलवर आधारित अनेक कादंबऱ्या, कथा आणि चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)