Guru Uday 2023 : गुरु गोचर होणार असल्याने याचा काही राशींच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. त्यांचे भाग्य उजळणार आहे. देवांचा गुरु म्हणून बृहस्पति हा शुभ ग्रह मानला जातो.  बृहस्पती महाराजांच्या आशीर्वादाशिवाय कोणीही जीवनात वर्चस्व आणि शुभ गोष्टी प्राप्त करू शकत नाही, असे सांगितले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत बृहस्पतिची स्थिची अधिक चांगले असते अशा लोकांना अनेक फायदे होतात. ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. जेव्हा जेव्हा बृहस्पति आपली रास बदलतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर कोणता ना कोणता परिणाम होत असतो. आता 27 एप्रिल 2023 रोजी गुरु मेष राशीत गोचर होत आहे. या गोचरमुळे 5 राशींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष रास -
 
Guru Uday मुळे मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे त्यांचे भाग्य उजळणार आहे. या राशींच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता अधिक आहे. चांगली बढती मिळण्याची शक्यता असल्याने हातात चांगला पैसा येईल. वरिष्ठ अधिकारीही तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्ही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.  तुम्हा एखादा लांबचा प्रवास करु शकता. तसेच देवदर्शनाचा लाभ घेऊ शकता. तुमचे अध्यात्मिक कल दिसून येईल.


मिथुन रास -


गुरु गोचरमुळे मिथुन राशींच्या लोकांसाठी नवी संधी मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी गुरुचा उदय लाभदायी ठरणार आहे. तुम्ही कमी वेळेत जास्त पैसे कमवू शकाल. एकापेक्षा जास्त व्यवसायात गुंतवणूक करुन तुम्ही लाभ मिळवू शकता. तुमच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. अनेक स्थानिकांना परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. हे तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करा. हातात पैसाही येईल.


सिंह रास -


गुरुचा तुमच्यावर मोठा वरदहस्त राहिल. तुमच्या हातात पैसा येईल. त्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला नफा आणि तोटा दोन्ही होण्याची शक्यता आहे. नवीन कामात गुंतवणूक शक्यतो करु नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.  अध्यात्माकडे तुमचा कल वाढत राहील. तसेच व्यवसायात प्रगती करु शकणार आहात.


धनु रास -


गुरुच्या गोचरमुळे तुमचे करिअरचे वाहनाच्या वेगाने पळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीसह नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मेष राशीत गुरुचा उदय फलदायी ठरेल. तुम्ही तुमची मेहनत आणि समर्पणाने तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात सक्षम व्हाल. या काळात तुम्ही व्यवसायात कोणताही नवीन प्रयोग देखील करु शकता. तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.


कुंभ रास -


कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. या राशीचे लोक त्यांच्या गोड बोलण्याने इतरांवर चांगली छाप पाडतील. या काळात तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. या राशीच्या लोकांना पैसा मिळवणे अधिक सोपे जाईल. तुम्हाला कामाच्या संदर्भात अधिक प्रवास करावा लागू शकतो पण प्रगती करु शकाल. प्रेमप्रकरणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तुमचे नाते सामान्य राहण्याची शक्यता आहे.