चार दिवसानंतर गुरु होणार वक्री, या 6 राशींवर असेल विशेष कृपा
गुरु ग्रहाच्या वक्री अवस्थेमुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ प्रभाव दिसून येईल.
Guru Vakri 2022: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह वर्षभर एका राशीत राहतो. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. गुरु ग्रहाचं मार्गक्रमण मेष ते मीन रास असं होतं. आता गुरु ग्रह स्वत:च्या मीन राशीत आहे. मात्र आता 5 महिने गुरु वक्री अवस्थेत असणार आहे. 29 जुलै 2022 रोजी गुरु वक्री होईल. या अवस्थेमुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ प्रभाव दिसून येईल. या काळात कोण कोणत्या राशींवर कृपा असेल जाणून घेऊयात.
वृषभ: गुरुची वक्री स्थिती वृषभ राशीसाठी फलदायी ठरेल. या काळात मान-सन्मान मिळेल. कुटुंबातील कलह दूर होतील. व्यवसाय तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.
कर्क: या कालावधीत कर्क राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव राहील. हातून धार्मिक कार्य घडतील. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल.
कन्या: या काळात नवे आर्थिक स्त्रोत तयार होतील. व्यवसायत नफ्यासोबत नवे करार निश्चित होतील. समाजात आपल्या कामाचं प्रशंसा होईल. त्यामुळे काळ आनंदी जाईल.
वृश्चिक: या राशीच्या लोकांची अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळतील. आरोग्यविषयक समस्या दूर होतील. तसेच कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
कुंभ: या काळात उत्पनाचे नवे मार्ग तयार होतील. गुंतवणुकीसाठी या काळ चांगला ठरेल. वैवाहिक जीवनातील कलह दूर होतील. तसेच अचानक धनलाभ होईल.
मीन: या काळात परदेश यात्रेचा योग जुळून येईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तसेच नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)