Neechbhang Rajyog : `या` 3 राशींसाठी शुभ दिवाळी! शुक्र गोचरमुळे 1 वर्षांनंतर नीचभंग राजयोग
Neechbhang Rajyog : प्रेम, आनंद आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह दिवाळीपूर्वी आपली स्थिती बदलणार आहे. कन्या राशीत गोचर करुन तो तीन राशीच्या लोकांची दिवाळी शुभ करणार आहे.
Neechbhang Rajyog : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बँक टू बँक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रेम, आनंद, ऐश्वर्याचा कारक शुक्र देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. येत्या 3 नोव्हेंबरला शुक्र सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र देव कन्या राशीत गोचर केल्यामुळे तब्बल 1 वर्षांनी शुभ असा नीचभंग राजयोग निर्माण होतो आहे. या राजयोगामुळे तीन राशींची दिवाळी खऱ्या अर्थाने शुभ असणार आहे. (Happy Diwali to these 3 zodiac signs Neechbhang Rajayoga after 1 year due to transit of Venus)
'या' राशींची दिवाळी असणार शुभ!
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. शुक्रदेव या लोकांना तिजोरीत पैशाचा प्रवाह वाढविणार आहे. चहूबाजूने पैशांचा ओघ वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नीचभंग राजयोग हा लव्ह लाइफसाठीही उत्तम असणार आहे. त्याशिवाय जोडीदारासोबत तुम्ही क्वालिटी टाइम घालवणार असून सहलीवर जाणार आहात. तुमच्यासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
नीचभंग राजयोगमुळे धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे. तुमच्या पैशांचा सर्व चिंता दूर होणार आहे. या लोकांची कार्यक्षेत्रात उन्नती होणार आहे. तर वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीमधील अडचणी दूर होणार आहे.
हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला शश राजयोगासह 4 दुर्मिळ योग! 'या' राशींच्या लोकांचं ग्रहण सुटणार, बँक बॅलेन्स वाढणार
मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांचा बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार आहे. बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. ऑफिसमध्ये बॉसची साथ तुम्हाला मिळणार आहे. नवीन योजनांना पाठबळ मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ या काळात तुम्हाला मिळणार आहे. दिवाळीपूर्वीच तुम्हाला धनाची पेटी लाभणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)