Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर आता या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. येत्या शनिवारी 28 ऑक्टोबर म्हणजे शरद पौर्णिमा, कोजागिरीला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण हे खगोलीय घटना असली तर वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अशुभ मानलं जातं. यंदा चंद्रग्रहणाला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. चंद्र आणि गुरुमुळे गजकेसरी योग, बुधादित्य योग, शश योग आणि पंचांगानुसार रवि आणि सिद्धी योग असणार आहे. या शुभ योग आणि राजयोगामुळे काही राशींचं भाग्य चंद्रासारख चमकणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. (4 Rare Yogas with Shasha Raja Yoga for Lunar Eclipse People of this zodiac sign bank balance will increase on chandra grahan 2023 )
मिथुन राशीच्या लोकांना चंद्रग्रहण अतिशय शुभ ठरणार आहे. तुमचं नशिब पालटणार आहे. व्यापारी वर्गाला मोठा नफा प्राप्त होणार आहे. तुमच्या उदरनिर्वाहात घसघशीत वाढ होणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. पालकांशी संबंध अधिक मजबूत होणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध मधुर असणार आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण भाग्यशाली सिद्ध होणार आहे. ग्रहण तुमच्या पारगमन कुंडलीच्या दहाव्या भावात होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. सरकारी योजनेत चांगला लाभ होणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदच आनंद असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलं होणार असून बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. व्यावसायिकांना चांगला लाभ होणार आहे. नवीन ऑर्डर तुम्हाला मिळणार आहे.
चंद्रग्रहण हे कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. तुमचं भाग्य उजळून निघणार आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे. भीतीपासून तुमची मुक्तता होणार आहे. प्रवासातून सकारात्मक परिणाम दिसून येईल. धैर्य आणि शौर्यात वाढणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यास यशस्वी व्हाल. उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा वेळ उत्तम असणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होणार आहे. शेअर्स, सट्टा आणि लॉटरीतून तुम्हाला नफा प्राप्त होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)