Hindu Nav Varsh 2024: 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू झाले असले तरी अजून हिंदू नववर्षाला सुरूवात झालेली नाही. वैदिक दिनदर्शिकेनुसार, 9 एप्रिलपासून हिंदू नववर्ष संवत 2081 सुरू होतंय. हे ज्योतिष शास्त्रासाठी खूप महत्वाचे असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत. 12 पैकी 3 राशींसाठी हे शुभ मानले जाते. दरम्यान हे 3 शुभ योग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानले जातात. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे.


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष खूप चांगले असणार आहे. यावेळी आर्थिक स्थिती मजबूत असेल. नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात ज्यामुळे उत्पन्न वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते. तुमच्या जीवनावर खूप सकारात्मक प्रभाव पडेल. अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. 


वृषभ रास


वृषभ राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष खूप शुभ राहील. हे वर्ष करिअरच्या दृष्टीने यशस्वी होईल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठीही काळ चांगला आहे. पदोन्नती होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यातूनही नफा मिळण्याची शक्यता आहे.


मकर रास


हिंदू नववर्ष मकर राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येईल. कौटुंबिक सुख-शांती राहील. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. नोकरदारांचे पगार वाढू शकतात. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. अडकलेले पैसे आता परत मिळू शकतात. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप आनंद मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )