मुंबई: सोमवारी काही राशींना सतर्क राहावं लागणार आहे. प्रॉपर्टी किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. अति विश्वास ठेवणं आपल्याला खूप जास्त महागात पडू शकतं त्यामुळे आता 12 राशींसाठी कसा असेल सोमवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करू शकता. व्यावसायिक लोकांनी प्रामाणिकपणे काम करणंच हिताचं ठरेल. कोर्ट आणि कोर्टाच्या कामातून सुटका होईल. तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पार पाडू शकाल.


वृषभ: सोमवारी चांगली बातमी मिळेल. ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. नफ्याचे नवीन मार्ग दिसतील. बऱ्याच काळापासून अडकलेल्या गोष्टी पूर्ण होतील.


मिथुन: स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. पटकन निर्णय घेण्याच्या नादात चूक करू नका.


कर्क: तुमचं मत मांडण्याची संधी मिळेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी डीलरसाठी सोमवार अधिक फायदेशीर आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा


सिंह: अधिकाऱ्यांकडून विशेष अधिकार मिळतील. इतरांना दिलेले पैसे परत येतील. अनावश्यक खर्चांवर वेळीच नियंत्रण घाला. जोडीदारासोबत नियोजन करा. 


कन्या:  सोमवारी आपलं मन प्रसन्न राहील. ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे.


तुळ: राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सोमवारी मन उत्साही राहील. व्यवसायिकांसाठी चांगला दिवस आहे. 


वृश्चिक: ऑनलाइन खरेदी करण्याची शक्यता. चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवू नका, सोमवारी आपल्याला सावध राहाणं गरजेचं आहे. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील.


धनु: आपल्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचे कोणतेही छंद किंवा कौशल्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. काही नवीन काम सुरू करण्याचा विचार नक्की करा.


मकर: दिवसाची सुरुवात नव्या आशेनं होईल. कामं वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात आज ज्येष्ठांचा सल्ला घ्या. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. 


कुंभ: छोट्या गोष्टींवरून राग येण्याची शक्यता आहे. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. कोणाच्याही सांगण्यावर पटकन विश्वास ठेवू नका. 


मीन: सोमवार तुमची प्रगती आणि प्रतिभा दाखवणारा असणार आहे. आर्थिक वृद्धी होईल.