मेष - आत्मविश्वासामुळे काही अडचणीच्या कामात यश प्राप्त होईल. पैसे आणि व्यवसायात लक्ष ठेवणं आवश्यक आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - आजचा दिवस कामकाजाचा दिवस आहे. सावध राहा. मानसिक तणाव जाणवेल. जोडीदाराकडून कोणतीही गोष्ट लपवू नका. 


मिथुन - व्यवसाय आणि नोकरीत कुटुंबाची साथ असेल. कामाच्या ठिकाणी विचार करून राहा. कामात लाभ होईल. 


कर्क - नव्या बिझनेसला आकर्षित करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल होण्याची अपेक्षा आहे. जुन्या गोष्टी दूर होतात. काही नवीन करण्याची इच्छा असेल तर जरूर प्रयत्न करा. 


सिंह - व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. रखडलेला पैसा परत मिळण्याची व्यवस्था होणार आहे. प्रयत्नांना आज यश येईल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


कन्या - नोकरी आणि व्यवसायात भावनांनी विचार करू नका. वादाचा सामना करावा लागेल. कुटुंबामध्ये काही अडचणी निर्माण होतील. 


तूळ - कर्जापासून मुक्तता मिळेल. कामावर लक्ष केंद्रीत करा. अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. आज नवीन योजना आखा त्याचा तुम्हाला लाभच होईल. 


वृश्चिक - व्यवसाय चांगला चालेल. आज खास काम पूर्ण होतील. तब्बेत चांगली राहील त्यामुळे कामात वेग येईल. 


धनु- कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील. 


मकर - अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो. 


कुंभ - नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता. पुस्तकं वाचाल. बऱ्याच दिवसांनी आत्मचिंतन करण्याचा योग येईल.


मीन - नोकरीत एखादा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल.