मुंबई : Year 2022 Horoscope : 2022 मध्ये सहा सर्वात भाग्यशाली राशी आहेत, तुम्हाला भरपूर प्रगती आणि पैसा मिळेल, असे संकेत आहेत. आता 2021 वर्ष संपायला फक्त एक महिना उरला आहे. त्याचवेळी नवीन वर्षाच्या म्हणजेच 2022 च्या (Year 2022)आगमनाच्या तयारीबरोबरच हे वर्ष आपल्यासाठी कसे असेल याची उत्सुकता सर्वांना लागली असेल. तर जाणून घ्या भविष्य. (Horoscope - Luckiest Zodiac Signs Of 2022) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्ष त्यांच्यासाठी भेटवस्तू किंवा समस्या घेऊन येईल. ज्योतिष शास्त्रानुसार 2022 हे वर्ष काही राशींसाठी उत्तम असणार आहे. यात 6 भाग्यशाली राशींबद्दल असे म्हणता येईल की हे वर्ष आयुष्य बदलणारे ठरू शकते.


2022 मधील भाग्यशाली राशी 


वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष उत्तम राहील. 2022 हे वर्ष करिअरसाठी चांगले आहे आणि मोठा सन्मान देणारे ठरेल. मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढेल. धन-संपत्ती वाढेल. आर्थिक स्थिरता येईल. तर काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुम्ही वर्षभर ऐशआरामाचे जीवन जगाल.


सिंह: नवीन वर्ष 2022 सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. येणारे वर्ष या राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी देईल. या संधी गमावू नका, कारण ते तुम्हाला भविष्यात मोठे फायदे देतील.
 
वृश्चिक: 2022 हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे. हे वर्ष तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करणारे ठरेल. एकूणच, सर्व काही तुमच्या बाजूने असेल.


तूळ: 2022 हे वर्ष तूळ राशीच्या लोकांना चांगले यश देईल. करिअर-पैशाच्याबाबतीत भरपूर फायदा होईल. जोडीदाराची साथ चांगली राहील. मोठी संधी असू शकते.


मकर: मकर राशीचे लोक 2022 मध्ये खूप प्रगती करतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नाव आणि पैसा दोन्ही मिळेल असे म्हणता येईल.


कुंभ: 2022 हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांचे जीवन बदलून टाकेल. ज्या काही समस्या होत्या त्या आता एक एक करून सुटायला सुरुवात होणार आहे. अखेर, आयुष्य पुन्हा रुळावर येईल. जीवनात प्रेमाचा प्रवेश होईल. काही लोकांचे लग्नही होऊ शकते.


 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)