Tulsi Vivah  : कार्तिकी म्हणजेच देवउठनी एकादशीची पूजा संपन्न झाली असून आजपासून तुळशी विवाहला सुरुवात झाली आहे. विष्णू भगवान यांची प्रिय तुळशी रोपाचं शालिग्रामरुपी विष्णूशी लग्न लावलं जातं. काही ठिकाणी तुळशीचं कृष्ण भगवानशी विवाह केला जातो. पूर्वीच्या काळात तुळशीचं घरातील किशोरवयीन मुलासोबत लग्न लावण्याची प्रथा होती.   (How to Tulsi Vivah at home Mangalashtak with complete pooja ritual mantra and Tulsi Vivah Rangoli Design video)


तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबरला रात्री 09.02 वाजता सुरू झाला असून 24 नोव्हेंबरला रात्री 07.05 वाजेपर्यंत आहे. हिंदू धर्मानुसार उदय तिथीनुसार 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला प्रारंभ झाला आहे. प्रदोष काळात तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी 5.25 पासून प्रदोष काळला प्रारंभ होईल.


हेसुद्धा वाचा - Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी


तुळशी विवाह विधी 


तुळशी विवाहची पंरपरा पूर्व काळापासून सुरु आहे. तुळशी विवाह केल्यामुळे कन्यादानाचं पुण्य मिळतं. तुळशी विवाहसाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करा. तुळशीविवाहासाठी अंगणात छान रांगोळी काढा. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Aarti Shirsat (@toprangolis)



त्यावर राधा-दामोदरचं चित्र काढा. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान केल्यावर. वृंदावनाला ऊस, झेंडूची फुलांनी सजवा. तर मुळाशी चिंचा अन् आवळा ठेवा. 


हेसुद्धा वाचा - या 6 लोकांनी आवळा खाऊ नये, फायद्याऐवजी होईल नुकसान 


प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार किंवा हौसेने तुळशीला विवाह करतात. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात. तुळशीला नवरीसारखं सजवण्यात येतं. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा होते. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने परिधान करा. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरा.



लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आणि तुळशीपत्रासोबत सोनं किंवा चांदीची तुळस काही ठिकाणी ठेवण्यात येते. असं म्हणतात की, तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. 



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)