Tulsi Vivah Rajyog : पंचांगानुसार द्वादशी आणि प्रदोष काळात तुळशी मातेचं लग्न सोहळ्याला सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुळशीचं लग्न करु शकता. आज तुळशीच्या लग्नाच्या दिवशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 6 राजयोगाची निर्मिती आहे. हे अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग काही राशीच्या नशिबाला कलाटणी मिळणार असून त्यांना अचानक धनलाभ होणार आहे. 24 नोव्हेंबर शुक्रवारी चंद्र मेष राशीत संध्याकाळी 4 वाजता गोचर करणार आहे. मेष राशीत गुरु देव विराजमान आहे. अशा स्थितीत गुरु चंद्र युती गजकेसरी योग निर्माण करत आहे. त्यासोबत षडाष्टक योग, महालक्ष्मी राजयोग, आयुष्मान राजयोग, सौभाग्य योग आणि आदित्य मंगल राजयोग तुम्हाला मालामाल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तर पंचांगानुसार आज सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योगाचा संयोग आहे. (tulsis wedding making 6 Rajyoga shadashtak yoga gajkesari rajyog Mahalaxmi Rajyog 2023 Aditya Mangal Yog Opportunity for these zodiac signs to become wealthy)
विवाहाचे अनेक राजयोग आणि शुभ संयोग तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. या लोकांवर भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. सुख, समृद्धी आणि धनलाभाचे शुभ योग जुळून आले आहेत. तुमचे रखडलेली कामं आता सहज मार्गी लागणार आहे. समाजात तुमचा मान सन्मानात वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा राजयोग शुभ असणार आहे. व्यवसायिकांना नफा मिळणार असून अचानक धनलाभ होईल. तुमच्या डोक्यावरुन कर्जाचे बोझे दूर होणार आहे.
हे अनेक राजयोग या राशींच्या लोकांसाठी चांगल सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांवरही देवी लक्ष्मी प्रसन्न राहणार आहे. तुमच्या समस्या या राजयोगामुळे दूर होणार आहे. तुमच्या कानावर मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. वाहन, मालमत्ता खरेदीची करणार आहात. कुटुंबाबरोबर आनंदाचं वातावरण असणार आहे.
या राशीच्या लोकांना तुळशी विवाहाचा दिवस शुभ ठरणार आहे. या योगाचा कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे.तुमच्या करिअरमध्ये तुम्ही उचं शिखर गाठणार आहात. अध्यात्मात तुमचा रस वाढणार आहे. तुम्हाला नवीन वर्षांत अनेक लाभ होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. कोर्टाशी संबंधित प्रकरण तुमच्या बाजूने लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)