Mahalakshmi And Panch Divya Yoga: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 9 फेब्रुवारी रोजी पंच दिव्य योग आणि राजयोग तयार झाला आहे. दरम्यान हे राजयोग 500 वर्षांनंतर जवळजवळ एकाच वेळी तयार झाले असल्याची माहिती आहे. या दिवशी आदित्य मंगल, बुधादित्य योग, चतुर्ग्रही योग, महालक्ष्मी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या काळात सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होाताना दिसतोय. यासोबतच मंगळ आणि चंद्राच्या मकर राशीत प्रवेशामुळे महालक्ष्मी योग तयार झाला असून मंगळ उच्च राशीत असल्यामुळे रुचक योग तयार होत आहे. या काळात 3 राशी अशा आहेत, ज्यांचं नशीब यावेळी चमकू शकणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हे योग शुभ ठरणार आहेत.


मेष रास (Aries Zodiac)


पाच पंच योगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी हे उत्तम असेल, तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या प्रेम जोडीदाराबद्दल सांगू शकता. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळतील. 


वृषभ राशि (Taurus Zodiac)


वृषभ राशीच्या लोकांसाठी पंच राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. व्यवसायात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे. बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळेल. 


कर्क रास (Cancer Zodiac)


पंच राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. याशिवाय तुम्हाला व्यवसायात अनेक चांगल्या संधी मिळतील. जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन शुभ राहील. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळतील. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )