मुंबई : प्रत्येक माणसाला जगण्यासाठी काही मुलभूत गरजा असतात. त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे अन्न. आपण कशा प्रकारे गोष्टी केल्या पाहिजेत? कसं जीवन जगायला हवं याचे काही नियम आणि परंपरा सनातन धर्मात सांगण्यात आल्या आहेत. शतके उलटली तरी कोटींच्या संख्येनं लोक आजही नियम आणि परंपरा पाळत आहेत. याचे कारण एवढा काळ लोटूनही हे नियम आपण पाळत आहोत. आज आपण जेवणाच्या संबंधीत 5 नियमांविषयी जाणून घेणार आहोत. बरेच लोक तर जेवणाच्या संबंधीत हे नियम पाळत नाहीत. अशा लोकांना द्रारिद्र येण्यास जास्त वेळ लागत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच वेळी ३ चपात्या/भाकरी घेऊ नका


सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्यात ३ क्रमांक अशुभ मानला जातो. असे म्हटले जाते की जेवण हे देखील असेच एक शुभ कर्म आहे. म्हणून, जेव्हा तुम्ही एखाद्याला जेवण वाढत असाल तेव्हा त्याला एकाच वेळी 3 चपात्या देऊ नका, तर 2 किंवा 4 चपात्या द्या. असे केल्याने त्या अन्नाचा शरीराला फायदा होतो आणि आरोग्य चांगले राहते. त्यामुळे डॉक्टरांचा खर्च वाचतो.


जेवणाच्या ताटात कधीही धुवू नका हात


शास्त्रानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात कधीही धुवू नका. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध मानले जाते आणि घाण देखील पसरवते. असे केल्यानं लक्ष्मीमाता आणि अन्नपूर्णा या नाराज होतात. त्यामुळे माणसाचे वाईट दिवस सुरू होतात आणि तो हळूहळू अधोगतीकडे वाटचाल करतो.


सगळ्यात आधी  जेवणाआधी श्लोक म्हणावा
पुराणात असे म्हटले आहे की जेव्हाही तुम्ही जेवण करण्यास सुरुवात कराल तेव्हा सर्वप्रथम श्लोक म्हणावा. असे केल्याने ते जेवण आपल्या शरीरात लागते आणि आपण निरोगी राहतो. म्हणून जेवायला बसल्यावर देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका, ज्याच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवन जगण्यासाठी अन्न मिळत आहे.


जेवणाच्या ताटात अन्न सोडू नये


अन्नाची नासाडी करणे हे सनातन धर्मात चुकीचे म्हटले आहे. जेवढी भूक लागते, तेवढंच अन्न माणसानं ताटात घ्यावे, असे विद्वानांचे म्हणणे आहे. गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्यानंतर न खाल्ल्याने ते खराब होते, त्यामुळे अन्नाचा अनादर होतो. अशा लोकांना माता अन्नपूर्णाचा कोप सहन करावा लागतो.


जमिनीवर बसून जेवण करा 


नेहमी जमिनीवर बसून जेवण करावे असे शास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने, पृथ्वी मातेच्या सकारात्मक लहरी पायांमधून आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे शरीर निरोगी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण होते. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यातही पाहायला मिळतो. (jevan kartanache niyam astrology tips for food rules of eating how we should eat food) 


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)