Kartik Pournima 2022: आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रारुपात असतात. त्यानंतर कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रारुपातून जागे होतात. त्यामुळे कार्तिक महिना भगवान विष्णूंसाठी प्रिय महिना आहे. कार्तिकी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची कृपा मिळवण्यासाठी उत्तम दिवस आहे. या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी कार्तिक पौर्णिमा (kartik Pournima) 8 नोव्हेंबरला आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण (Chandra Grahan) देखील आहे. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय खास ठरणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक पौर्णिमेला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करा. जर असं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिसळून घ्या. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे शुभ राहील. असं केल्यानं पाप नष्ट होतात अशी धारणा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास गौ दान केल्याचं पुण्य मिळतं. त्याचबरोबर जीवनात अपार सुख-समृद्धी येते. या दिवशी दान नक्की करा. तुमच्या सामर्थ्यानुसार गरीब आणि गरजूंना दान करा. यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल.


या दिवशी घराच्या मुख्य दारावर हळदीने स्वास्तिक चिन्ह काढा. त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं तोरण लावा. तसेच संध्याकाळच्या वेळेस तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहील. या दिवशी न चुकता तुळसीच्या रोपाजवळ दिवा लावा आणि रोपाजवळील मातीचा तिलक लावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.


Chandra Grahan: मेष राशीत होणार या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र


कार्तिक पौर्णिमा शुभ मुहूर्त 


  • पौर्णिमा तिथी सुरुवात- 7 नोव्हेंबर दुपारी 4.15 वाजता

  • पौर्णिमा तिथी समाप्त - 8 नोव्हेंबर दुपारी 4.31 वाजता

  • पूजेची शुभ वेळ: 8 नोव्हेंबर 2022, दुपारी 4.57 ते 5.49 पर्यंत.

  • ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नानाची वेळ - 4.57 ते 5.49 (8 नोव्हेंबर 2022)


या वेळचं चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. ग्रहणाला संध्याकाळी 5.32 वाजल्यापासून सुरुवात होईल. ग्रहण संध्याकाळी 6.18 वाजेपर्यंत संपेल. सूतक कालावधी सकाळी 9.21 वाजल्यापासून सुरु होईल आणि  संध्याकाळी 6.18 वाजेपर्यंत असेल.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)