Kojagiri Purnima 2024 : दसऱ्यानंतर वेध लागतात ते कोजागरी पौर्णिमेचे...आज आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे, जी शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तर महाराष्ट्रात याला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. या दिवशी आकाशातून अमृतवृष्टी होते असं म्हणतात. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध तर काही ठिकाणी खीर ठेवण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला माहित आहे का की आपल्या देशातील काही शहरांमध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशाखाली खीर ठेवली की ती काळी पडते! असे का घडतं? आकाशातून पडणारा अमृताचा वर्षाव या शहरांमध्ये विष बनतेय, काय आहे यामागील सत्य जाणून घ्या. (Kojagiri Purnima or sharad purnima milk is kept under moon turns black in these cities astrology in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये पाळली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, अशी अनेक शहरं आहेत जिथे शरद पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशाखाली खीर किंवा दूध भरलेली वाटी ठेवली तर ती खीर काही वेळाने काळी पडते, असं स्थानिक लोक सांगतात. हो ही कुठली बनावट बातमी नसून यामागे एक सत्य आहे. 


हेसुद्धा वाचा - Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?


खीर काळी का होते?


शरद पौर्णिमेच्या रात्री दुधाची पांढरी खीर भरलेली वाटी खुल्या आकाशाखाली ठेवली की ती काळी पडते, त्यामागे कुठलीही अलौकिक, दैवी किंवा कुठलीही दैवी शक्ती सामील नसून त्यामागे एक गंभीर समस्या आहे. खरंतर, आपण ज्या शहरांबद्दल बोलत आहोत त्या सर्व शहरांभोवती कोळशाच्या खाणी आहेत. 


त्यामुळे तेथे कोळशाच्या खाणकाम होत असल्याने कोळशाचे बारीक कण हवेत तरंगत असतात, जे उघड्या डोळ्यांनाही दिसत नाहीत. पण रात्रीच्या वेळी जेव्हा लोक भक्तीभावाने खुल्या आकाशाखाली खीर भरलेली वाटी ठेवतात तेव्हा त्या खीरवर कोळशाच्या धुळीचा थर पसरतो, ज्यामुळे पांढरी खीर काळी दिसते. 


हे कोणत्या शहरात घडते?


छत्तीसगड - कोरबा, बिलासपूर, रायपूर
मध्य प्रदेश - सिंगरौली, छिंदवाडा
झारखंड - हजारीबाग - झरिया


हे फक्त शरद पौर्णिमेच्या रात्रीच होत नाही तर सर्वसाधारणपणे असंच घडतं. त्यामुळे या शहरांतील लोकांनाही खूप अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: स्ट्रीट फूड इत्यादींबाबत भरपूर स्वच्छता राखावी लागते. यासोबतच हलक्या रंगाचे कपडे लवकर घाण होणे, धूळ आणि कोळशाचे कण हवेत पसरत असल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)