Lampat Yog : राहू - शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण होणार लंपट योग! `या` लोकांच्या होणार प्रचंड धनलाभ?
Lampat Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रदेवाने पूर्वाषादा नक्षत्रात असणार आहे. त्यात जेव्हा कुठल्या राशीत राहू आणि शुक्राची भेट होते तेव्हा अतिशय शुभ असा लंपट योग निर्माण होता. या योगामुळे काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Rahu Shukr Yuti / Lampat Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात एका ठराविक वेळेनंतर ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलतात. या 9 ग्रहांच्या स्थिती बदलामुळे अनेक योग निर्माण होत असतात. काही योग हे शुभ असतात तर काही अशुभ असतात. जे पृथ्वीतलावर, मानवाच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. संपत्ती आणि सुखाचा कारक शुक्रदेव लवकर राहू ग्रहाशी एका राशीत भेटणार आहे. यातीन एक शुभ योग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या योगाचा नाव आहे लंपट योग. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत हा योग कमी किंवा जास्त परिणामकारक आहे की नाही हे या दोन ग्रहांचा अंतरावर दिसून येतं. पण साधारण हा लंपट योग कोणत्या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे, पाहूयात. (Lampat Yoga will be created due to the combination of Rahu Venus These zodiac sign people will get huge money)
मिथुन रास (Gemini Zodiac)
राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे जो लपंट योग निर्माण होणार आहे. याचा फायदा हा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. या लोकांचे प्रचंड उत्पन्न वाढणार आहे. नवीन स्त्रोतातून पैसे कमावण्याची संधी मिळणार असल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्याशिवाय घरातील सुखद वस्तूमध्ये वाढ होणार आहे. आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.
तूळ रास (Libra Zodiac)
तूळ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राने निर्माण होणारा लपंट योग हा खूप शुभ सिद्ध होणार आहे. तुमच्या भौतिक सुखात वाढ होणार आहे. तुम्हाला पालक किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून आर्थिक लाभ मिळणार आहे. तसंच, तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे.
मीन रास (Pisces Zodiac)
मीन राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राचा संयोगातून निर्माण झालेला लपंट योग अतिशय भाग्यशाली सिद्ध होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)