मुंबई: देशभरात आज महाशिवरात्र साजरी केली जात आहे. या शुभ दिवशी आपला दिवस कसा असेल कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो जाणून घ्या आजचं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. आपल्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. 


वृषभ- आज आपल्याला खूप जास्त परिश्रम करावे लागतील. शंकराला आज कमळ अर्पण करा. आजचा दिवस शुभ जाईल. 


मिथुन- वाद-विवादापासून आज आपण दूर राहा. न्यायालयात जाण्याची वेळ येईल. अचानक आनंदाची वर्ता मिळू शकते. 


कर्क- आज आपल्याकडून पैशांची बचत होईल.  भगवान शंकराला 11 बेलपत्र अर्पण करा. 


सिंह- घरगुती समस्या उद्भवतील. आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. 


कन्या- कुटुंबात उत्तम वातावरण राहिल. आज आपल्याला धनलाभ होईल. 


तुला- आज मतभेदापासून दूर राहा. आर्थिक लाभ होईल. भगवान शंकराला कापूर अर्पण करा. 


वृश्चिक- मित्रांची मदत मिळेल. आज आपले व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.


धनु- नवीन व्यवसाय किंवा काम करताना विशेष काळजी घ्या. कुटुंबाकडून आज आपल्याला मदत मिळेल. 


मकर- आर्थिक लाभ होईल. आई-वडिलांचं जीवन खूप सुखी होईल. आजचा दिवस शुभ असेल. 


कुंभ- अनोळखी व्यक्तींशी भेटीगाठी होतील. भगवान शंकराला रुद्राक्ष अर्पण करा आजचा दिवस चांगला जाईल. 


मीन- घरात शांतता आणि सुख नांदेल. आज आपल्याला योग्य न्याय मिळेल. भगवान शंकराला आज लाडूचा नैवेद्य द्या आजचा दिवस चांगला जाईल.