महाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो?
जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला भगवान शंकर अशाच रूपात दिलेस. त्यामुळे त्याच्या गळ्यात साप का असावा असा प्रश्न पडणे स्वाभाविक.
मुंबई: एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू, गळ्यात साप, कपाळाला चंदन आणि डोक्यावर भरपूर वाढलेला केशंभार. जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला भगवान शंकर अशाच रूपात दिलेस. त्यामुळे त्याच्या गळ्यात साप का असावा असा प्रश्न पडणे स्वाभाविक.
पुराण कथांमध्ये नागाचा उल्लेख
भगवान शंकराची जगभरातील कोणतीही मूर्ती घ्या. तुम्हाला तिच्या गळ्यात नाग असलेला दिसेल. पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार या नागाचे नाव वासुकी असे आहे. हा नाग नागांचा राजा आहे. तसेच, नागलोकात याचे शासन आहे. सागर मंथनावेली या नागाने एखाद्या रश्शी प्रमाणे काम केले. ज्यामुळे सागराचे ताक घुसळल्याप्रामाणे मंथन झाले. वासुकी नाग हा भगवान शंकराचा भक्त असल्याचेही सांगितले जाते. त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला नागलोकांचा राजन बनवले. सोबतच आपल्या गळ्यातील भूषणाचा दर्जाही दिला. म्हणूनच नाग हा शंकराच्या गळ्यात वेटोळे घालून बसलेला दिसतो.
अनेक वर्षांनी आला दुर्मिळ योग
दरम्यान, भगवान शंकराला महादेव म्हणूनही ओळखले जाते. जगभरातील तमाम शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाशिवरात्री जगभरात उत्साहाने साजरी केली जात आहे. अर्थात, अनेक वर्षांनंतर दुर्मिळ योग आल्याने काही ठिकाणी १३ तर काही ठिकाणी १४ फेब्रुवारीलाही महाशिवरात्री साजरी केली जात आहे.