Grah Gochar 2022: 13 नोव्हेंबरला दोन ग्रह करणार एकत्र गोचर, या लोकांना मिळणार साथ
Grah Gochar In November 2022: नोव्हेंबर महिन्यात आपलं राशीफळ कसं असेल याबाबत ज्योतिष मानणाऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे.
Grah Gochar In November 2022: नोव्हेंबर महिन्यात आपलं राशीफळ कसं असेल याबाबत ज्योतिष मानणाऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. एकाच दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला बुध आणि मंगळ ग्रह गोचर करणार आहेत. मंगळ ग्रह वृषभ राशीत, तर बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशी परिवर्तनामुळे सहा राशींना फायदा होणार आहे. वृषभ, कर्क, सिंह, धनु आणि मकर राशीचा यात समावेश आहे.
वृषभ - या राशीच्या लोकांना मंगळ आणि बुधाच्या गोचराचा फायदा होईल. बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी आहे आणि मंगळ हा सातव्या आणि बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. या काळात बुध या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. विवाहासाठी मंगळाचे संक्रमण शुभ राहील.
कर्क - ज्योतिष शास्त्रानुसार या दोन ग्रहांच्या गोचराचा लाभ या राशीच्या विद्यार्थ्यांना लाभदायी ठरेल. या काळात रहिवाशांची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. या काळात तुमची अडकलेली कामं मार्गस्थ होतील. पण कामाचा पाठपुरावा योग्य रितीनं घेणं आवश्यक आहे.
सिंह - या राशीतील नवव्या स्थानात मंगळाचं गोचर होणार आहे. दुसरीकडे दुसऱ्या आणि अकराव्या स्थानावर बुध ग्रहाचे अधिपत्य आहे. या काळात वाहन खरेदीचा योग आहे. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात.
Mangal Vakri 2022: मिथुन राशीतील वक्री मंगळामुळे 'राजयोग', या 4 राशींचं भाग्य फळफळणार!
धनु - या काळात या राशींच्या लोकांना प्रवासाचा योग जुळून येईल. तसेच शत्रूंवर या काळात मात करू शकतात. बुधाच्या गोचरामुळे लोकांना व्यवसायात लाभ होईल. करिअरमध्ये यश मिळेल.
मकर - मंगळ या राशीच्या चौथ्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे. तर बुध सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. संशोधन कार्यात गुंतलेल्या लोकांसाठी मंगळ लाभदायक ठरेल. त्याचबरोबर बुधाच्या संक्रमणापूर्वी मेहनतीला चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)