Mangal Vakri 2022: मिथुन राशीतील वक्री मंगळामुळे 'राजयोग', या 4 राशींचं भाग्य फळफळणार!

Mangal Vakri 2022 Impact: ज्योतिष मानणाऱ्या लोकांचं ग्रहांच्या गोचराकडे विशेष लक्ष असतं. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे. त्याबरोबर वक्री आहे का? यावरून अंदाज बांधले जातात. काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर राशी बदल करतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात. 

Updated: Oct 30, 2022, 06:30 PM IST
Mangal Vakri 2022: मिथुन राशीतील वक्री मंगळामुळे 'राजयोग', या 4 राशींचं भाग्य फळफळणार! title=

Mangal Vakri 2022 Impact: ज्योतिष मानणाऱ्या लोकांचं ग्रहांच्या गोचराकडे विशेष लक्ष असतं. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे. त्याबरोबर वक्री आहे का? यावरून अंदाज बांधले जातात. काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर राशी बदल करतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात. दुसरीकडे चंद्र आणि सूर्य हे ग्रह सोडले तर बाकीचे ग्रह वक्री होतात. या स्थितीचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. तसेच काही राशींना फायदा देखील होतो. मंगळ ग्रहाने 16 ऑक्टोबरला वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता 30 ऑक्टोबरपासून वक्री अवस्थेत असणार आहे. यामुळे महापुरुष राजयोग तयार झाला आहे. या स्थितीचा चार राशींवर चांगला परिणाम होणार आहे. चला जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत..

वृषभ- या राशीवर वक्री मंगळ ग्रहाची विशेष कृपा असणार आहे. या काळात उत्पन्नात वाढ होईल. नोकरी आणि व्यापारात प्रगती होईल. समाजात मानसन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह- वक्री मंगळ या राशीसाठी लाभदायक असणार आहे. अडकलेली कामं मार्गस्थ होतील. तसेच प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानार्जनात यश मिळेल. कुटुंबात धार्मिक तसेच मंगळ कार्य पार पडतील.

कन्या- वक्री मंगळामुळे महापुरूष राजयोग तयार झाला आहे. यामुळे कन्या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळेल. व्यापारात प्रगती दिसेल. तसेच समाजात मानसन्मान वाढेल.

कुंभ- मंगळ वक्री स्थिती असल्याने कुंभ राशीला फायदा होईल. महापुरुष राजयोग ऊर्जा, उत्साह आणि कामात यश मिळवून देईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच विविध मार्गातून धनलाभ होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)