Mangal Gochar 2023 : पुढील महिन्यात मंगळ करणार गोचर; `या` स्थिती, राशींचे खुलणार आर्थिक मार्ग
Mangal Gochar 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलामुळे 3 राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहे.
Mangal Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. पुढील महिन्यामध्ये मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. मंगळ ग्रहाच्या या गोचरचा परिणाम सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे.
ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या या राशी बदलामुळे 3 राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहे. यावेळी त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होणार आहे. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत.
वृश्चिक रास ( Scorpio )
ऑगस्ट महिन्यात होणार मंगळाचं गोचर हे या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या गोचरमुळे तुमचे उत्पन्न वाढू शकतं. जुनी कामं तुम्हाला भविष्यात लाभ देणार आहेत. याशिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील विकसित होणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक फायदा होऊ शकणार आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही लोकांचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
मकर रास ( Capricorn )
कुंडलीच्या नवव्या घरात मंगळाचं भ्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या आय़ुष्यात चांगले आणि आनंदाचे भरपूर क्षण येणार आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होणार आहेत. या काळात नशीब तुमच्या सोबत राहणार आहे.
सिंह रास ( Leo )
मंगळाच्या राशीत बदलामुळे तुमची रखडलेली कामं सुरू होणार आहे. आतापर्यंत अडकलेले प्रकल्प सुरू होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदारीही मिळू शकते. कुटुंबातील लोकं तुमच्या वागण्यावर खूश असणार आहेत. कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते पैसे मिळू शकणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )