Mangal Gochar 2023: मंगळ करणार कन्या राशीत प्रवेश; `या` राशींना बसणार मोठा आर्थिक फटका
Effect of Mangal Gochar 2023 : येत्या 18 ऑगस्टला मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना याचा विपरीत परिणाम पहायला मिळणार आहे. जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना अशुभ परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.
Effect of Mangal Gochar 2023 : शास्त्रानुसार मंगल या शब्दाचा अर्थ शुभ असा घेतला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला 'भूमीपुत्र' असंही म्हटलं जातं. सनातन धर्मात मंगळाचा विविध देवतांशी संबंध सांगण्यात आला आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या 18 ऑगस्टला मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
दरम्यान मंगळाच्या या राशी बदलामुळे सर्व राशींना फायदा होणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना याचा विपरीत परिणाम पहायला मिळणार आहे. जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना अशुभ परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.
मिथुन रास
मंगळाचे गोचर या राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम आणणार नाही. या काळात पती-पत्नीमधील संबंध ताणले जाण्याची अधिक शक्यता आहे. काही लोकं त्यांच्या जोडीदारावर संशय घेऊ शकतात. तुम्हाला या काळात मोठं कर्ज घ्यावे लागेल. कर्जाची परतफेड करणे कठीण होऊ शकते. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अचानक काही मोठे खर्च येऊ शकतात.
मकर रास
या राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर अडचणी आणणारं ठरणार आहे. यावेळी तुमचा मूड आक्रमक आणि त्याची भाषा कठोर असू शकते. ओळखीच्या लोकांशी संबंधांमध्ये ताण येईल. तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. प्रवास किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे खर्च वाढू शकतो. कुटुंबामध्ये एखादा मोठा वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सगळे तुम्हाला नावं ठेवतील.
मीन रास
मंगळाच्या गोचरमुळे तुम्हाला तुमच्या नोकरीबाबत असुरक्षित वाटेल. तुमच्या जोडीदारासोबत वादाला सामोरे जावे लागू शकते. खूप प्रयत्न करूनही तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकणार नाहीत. या काळात घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विचार पुढे ढकलेला बरा. कोणताही निर्णय किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. कोणत्याही गोष्टीत विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करू नका.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )